कांद्याची कचोरी | Pyaaz Kachori Recipe in Marathi

प्रेषक Jyothi Rajesh  |  15th Feb 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Pyaaz Kachori by Jyothi Rajesh at BetterButter
कांद्याची कचोरी by Jyothi Rajesh
 • तयारी साठी वेळ

  2

  1 /2तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4040

0

कांद्याची कचोरी recipe

कांद्याची कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pyaaz Kachori Recipe in Marathi )

 • 2 वाट्या मैदा
 • 1 लहान चमचा मीठ
 • 1 लहान चमचा तेल
 • आवश्यकतेनुसार पाणी
 • तळण्यासाठी तेल :
 • भरण्यासाठी :
 • 3 कांदे
 • 2 हिरव्या मिरच्या
 • 1 लहान चमचा जिरे
 • 1 लहान चमचा आले-लसणाची पेस्ट
 • 1 लहान चमचा धणेपूड
 • 1 लहान चमचा हळद
 • 1 लहान चमचा लाल तिखट
 • 1 लहान चमचा भाजलेली जिरेपूड
 • 1 लहान चमचा गरम मसाला
 • मीठ चवीनुसार
 • 1 लहान चमचा तेल

कांद्याची कचोरी | How to make Pyaaz Kachori Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात मैदा, मीठ आणि तेल एकत्र करून एकजीव करा. पाणी घालून लुसलुशीत पीठ मळा. तुम्ही तूप सुद्धा घालू शकता. जवळजवळ 1 ते 2 तास झाकून ठेवा.
 2. तोपर्यंत सारण बनविण्यास लागणारे साहित्य तयार करा. एक मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जीर घालून तडतडवा. नंतर कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळा.
 3. नंतर त्यात आले-लसणाची पेस्ट घाला आणि त्याचा कच्चा गंध जाईपर्यंत शिजवा.
 4. आता सर्व मसाले घाला आणि नीट मिसळा. चवीनुसार मीठ घाला आणि मंद आचेवर एक मिनिटासाठी शिजवा. गॅस बंद करा आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.
 5. पिठाला हलक्या हाताने मळा आणि याचे एकसमान भाग करा. तसेच भरण्याच्या सारणाचे देखील एकसमान भाग करा.
 6. आता तळण्यासाठी एका मोठ्या कढईत तेल गरम करा.
 7. पिठाला घेऊन एक गोलाकार गोळा बनवा. त्याला 3 इंच वर्तुळात चपटे लाटा. नंतर मध्यभागी सारण ठेवा. नंतर सर्व बाजूंच्या कडा एकत्र करून बंद करा आणि पुन्हा 3 इंच गोलाकार लाटा आणि बाजूला ठेवा.
 8. ही प्रक्रिया सर्व गोळ्यांबरोबर करा.
 9. गरम तेलात एक एक कचोरी मध्यम आचेवर 3 मिनिटांपर्यंत तळा. नंतर आच कमी करून 5 मिनिटे तळा. नंतर तेल निथळण्यासाठी त्यांना किचन पेपरवर काढून ठेवा.
 10. या स्वादिष्ट कांद्याच्या कचोऱ्या त्वरित वाढा. तिखट हिरवी चटणी आणि गोड खजूर-चिंचेच्या चटणीबरोबर या छान लागतात.

Reviews for Pyaaz Kachori Recipe in Marathi (0)