Photo of Ram Laddoo by Anjana Chaturvedi at BetterButter
2777
558
4.0(1)
1

राम लाडू

Feb-16-2016
Anjana Chaturvedi
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • युपी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 6

  1. 3/4 वाटी मुगाची डाळ
  2. 1/4 वाटी चणाडाळ
  3. हिरव्या मिरच्या -3
  4. किसलेले आले - 1 लहान चमचा
  5. 2 मोठे चमचे कोथिंबीर
  6. लाल तिखट - 1 लहान चमचा
  7. हिंग - 1/4 लहान चमचा
  8. जिरे - अर्धा लहान चमचा
  9. मीठ - 1 लहान चमचा
  10. सजविण्यासाठी :-
  11. 1 वाटी मुळा
  12. 2 लहान चमचे - ताजी कोथिंबीर
  13. 2 लहान चमचे लिंबाचा रस
  14. अर्धा लहान चमचा लाल तिखट
  15. आर्धा लहान चमचा काळे मीठ
  16. 3/4 वाटी चिंचेची चटणी
  17. 3/4 वाटी हिरवी चटणी

सूचना

  1. दोन्ही डाळींमध्ये पुरेसे पाणी घालून जवळजवळ 4 तास भिजवून ठेवा.
  2. नंतर पाणी काढून टाका आणि पुन्हा धुवा. त्यात हिरवी मिरची आणि हिंग घालून एकत्र करून वाटा. मिश्रण जाड आणि किंचित कडक असले पाहिजे. याला पूर्णपणे मऊ करू नका.
  3. आता या मिश्रणाला एका वाडग्यात घ्या आणि हलके आणि फुललेले होईपर्यंत फेटा.
  4. याला तपासण्यासाठी - एका वाडग्यात पाणी घ्या आणि त्यात मिश्रणातून एक लहान थेंब टाका. जर तो तरंगला तर समजा की मिश्रण तळण्यासाठी तयार आहे, अन्यथा त्याला आणखी फेटा आणि पुन्हा तपासा.
  5. मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात मीठ, जिरे आणि किसलेले आले मिसळा.
  6. एका कढईत तेल गरम करा. आता तुमचे हात ओले करा आणि तुमच्या हातात थोडे मिश्रण घ्या आणि भजी तळा.
  7. मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळा आणि पेपर नॅपकिनवर तेल झिरपण्यासाठी ठेवा.
  8. वाढण्याच्या प्लेटमध्ये ठेवा आणि गोळे हलके दाबा.
  9. त्यावर हिरवी आणि चिंचेची चटणी घाला.
  10. नंतर त्यात किसलेला मुळा, लिंबाचा रस आणि थोडे लाल तिखट आणि काळे मीठ घाला.
  11. शेवटी कोथिंबीर पसरा आणि टूथपिकबरोबर गरमागरम वाढा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mukta Deolalikar
Jul-12-2018
Mukta Deolalikar   Jul-12-2018

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर