उकडलेले वेज आणि पनीर मोमोज | Steamed veg and paneer momos Recipe in Marathi

प्रेषक Monika S Suman  |  16th Feb 2016  |  
4 from 1 review Rate It!
 • Photo of Steamed veg and paneer momos by Monika S Suman at BetterButter
उकडलेले वेज आणि पनीर मोमोजby Monika S Suman
 • तयारी साठी वेळ

  40

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

9355

1

Video for key ingredients

 • How to make Idli/Dosa Batter

उकडलेले वेज आणि पनीर मोमोज recipe

उकडलेले वेज आणि पनीर मोमोज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Steamed veg and paneer momos Recipe in Marathi )

 • सारणासाठी:
 • अर्धी वाटी किसून पाणी काढलेली कोबी
 • अर्धी वाटी पनीर, किसलेले किंवा कुसकरलेले
 • 1/4 वाटी भोपळा मिरची बारीक चिरलेली
 • 1 मध्यम कांदा बारीक चिरलेला
 • 5 मोठे चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली
 • 4 लसणाच्या पाकळ्या किसलेल्या
 • 1 इंच आल्याचा तुकडा किसलेला
 • हिरव्या मिरच्या स्वादानुसार
 • मीठ स्वादानुसार
 • लाल चटणी बनविण्यासाठी:
 • 2 टोमॅटो
 • 1 हिरवी मिरची
 • 4 पाकळ्या लसूण
 • 1 लहान चमचा मोहरीचे तेल
 • मीठ स्वादानुसार
 • 2 लहान चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
 • कणिक बनविण्यासाठी:
 • 1 वाटी मैदा
 • 1/4 लहान चमचा मीठ
 • 1 लहान चमचा तेल
 • मळण्यासाठी कोमट पाणी

उकडलेले वेज आणि पनीर मोमोज | How to make Steamed veg and paneer momos Recipe in Marathi

 1. कणिक तयार करण्यासाठी मैदा, मीठ आणि तेल एकत्र करा. त्यात थोडे कोमट पाणी घालून मऊ कणिक मळून घ्या. नंतर त्याला ओल्या कापडाने झाकून ठेवा.
 2. वर सांगितल्यानुसार सारण बनविण्यासाठीच्या सामग्रीस एकत्र करा आणि बाजूला ठेवा.
 3. मोमोज बनविण्यासाठी तयार केलेल्या कणिककाचे 14 समान भाग करा. एक भाग घ्या, त्याला हाताने गोल करा आणि याला लाटण्याच्या मदतीने शक्य तितके पातळ लाटा. (पोळी बनवितो त्याप्रमाणे)
 4. याच्या मध्यभागी सारण ठेवा आणि दोन्ही बाजूंना एकत्र करून बंद करा (जसे चित्रात दाखविले आहे त्याप्रमाणे) नंतर एका ओल्या कापडाने झाकून ठेवा. बाकी राहिलेल्या 13 गोळ्यांना देखील याप्रमाणे करा.
 5. सर्व मोमोज तयार झाले की त्यांना मोमो स्टॅन्ड किंवा इडलीच्या स्टॅन्डमध्ये ठेऊन 15 मिनिटे मध्यम आचेवर वाफेवर शिजवा.
 6. चटणी बनविण्यासाठी एका कुकरमध्ये पाणी घ्या. त्यात टोमॅटो, लसूण आणि मिरची घालून 1 शिटी होईपर्यंत शिजवा. 1 शिटी झाल्यावर गॅस बंद करा. आणि कुकर थंड होऊ द्या.
 7. कुकर थंड झाल्यावर टोमॅटो, लसूण आणि मिरची थंड होऊ द्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटा. त्याला एका वाडग्यात काढा. त्यात मीठ, मोहरीचे तेल आणि कोथिंबीर मिसळा.
 8. नंतर गरमागरम मोमोज चटणीबरोबर वाढा.

My Tip:

*चटणी आणि सारण दोघांमध्ये कोथिंबीरीची पाने घालायला विसरू नका. याच्यामुळे चवीत वाढ होते. *चटणी आणि सारण दोघांमध्ये आणखी मिरच्या टाकून मसाल्याची पातळी तुमच्या चवीनुसार वाढवा. या रेसिपीमध्ये सामान्य मसाले आहेत.

Reviews for Steamed veg and paneer momos Recipe in Marathi (1)

Aarti Nijapkara year ago

वाफावलेले उकडलेले नाही
Reply

Cooked it ? Share your Photo