मुख्यपृष्ठ / पाककृती / पुणेरी वांगे

Photo of Puneri vange by Rohini Rathi at BetterButter
1154
8
0.0(0)
0

पुणेरी वांगे

Jan-29-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुणेरी वांगे कृती बद्दल

घरात भाजी नसल्यास करण्यास सोपे व झटपट बनणारे हे वांगे खाण्यास खूप स्वादिष्ट व चविष्ट लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वांग्याचे आवरण बनवण्यासाठी
  2. बेसन अर्धा कप
  3. मिरची अर्धा टीस्पून
  4. तेल अर्धा टीस्पून
  5. मीठ चवीनुसार
  6. वांग्याच्या आतील सारण बनवण्यासाठी
  7. किसलेले खोबरे अर्धा कप
  8. गरम मसाला एक टिस्पून
  9. लाल मिरची पावडर एक टीस्पून
  10. हळद चिमटीभर
  11. हिंग चिमुटभर
  12. मीठ चवीनुसार
  13. ग्रेव्ही बनवण्यासाठी
  14. टोमॅटो 2
  15. कांदा 2
  16. लसणाच्या पाकळ्या चार ते पाच
  17. आल्याची पेस्ट 1 टी-स्पून
  18. तीळ दोन टेबल स्पून
  19. तेल दोन टेबल स्पून
  20. लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
  21. गरम मसाला एक टिस्पून
  22. मोहरी अर्धा टीस्पून
  23. जिरे अर्धा टीस्पून
  24. हिंग चिमुटभर
  25. हळदी पावडर अर्धा टीस्पून
  26. मीठ चवीनुसार
  27. बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेले खोबरे सजवण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम वांग्याचे आवरण बनवण्यासाठी बेसन तेल लाल मिरची हळद मीठ एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्यावे
  2. वांग्याच्या आतील सारण बनवण्यासाठी बारीक किसलेले खोबरे त्यात लाल मिरची पावडर हळदी पावडर गरम मसाला तेल मीठ चवीनुसार घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  3. आवरणाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन छोटी पोळी बनवून त्यात सारण भरून घ्यावे व वांग्याचा आकार द्यावा
  4. ग्रेव्हीसाठी तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो लसणाच्या पाकळ्या तीळ आलं पेस्ट दोन मिनिटे परतून घ्यावे
  5. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक दळून ग्रेव्ही बनवून घ्यावी
  6. कढईत तेल गरम करून मोहरी व जिरे यांची फोडणी घालून हिंग घालावे
  7. त्यात ग्रेव्ही घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  8. आवश्यकतेनुसार पाणी घालून तयार वांगे त्यात सोडून मंद आचेवर वांगे ग्रेव्ही शिजवून घ्यावी
  9. वांगे व्यवस्थित शिजल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर व किसलेले खोबरे घालून गरम पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर