मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन मलबारी

Photo of Chicken Malbari by Aarti Nijapkar at BetterButter
789
9
0.0(0)
0

चिकन मलबारी

Jan-29-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन मलबारी कृती बद्दल

चिकन मलबारी हि अतिशय स्वादिष्ट अशी मेजवानी आहे कारण आपल्या नेहमीच्या वापरात न आढळणारा म्हणजे खोबर्याच तेल ह्यामुळे हि रेसिपी मस्त होणार आहे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  •  केरळ
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चिकन चे तूकडे १ कप
  2. तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता १ कप
  3. कांदा चिरलेला २ मोठे चमचे
  4. टोमॅटो चिरलेला १ लहान चमचा
  5. लसूण बारीक केलेली १/२ चमचा
  6. आलं पेस्ट १ लहान चमचा
  7. लसूण पेस्ट १ लहान चमचा
  8. धना पावडर १ लहान चमचा
  9. जिरे पावडर १ लहान चमचा
  10. गरम मसाला १ लहान चमचा
  11. लाल तिखट १ मोठा चमचा
  12. बडिशेप भाजून केलेली पावडर १ लहान चमचा
  13. मीठ स्वादानुसार
  14. खोबरं तेल ३ मोठे चमचे
  15. खोबर्याच दूध १/२ कप
  16. मलबारी पेस्ट
  17. कांदा २ मोठे
  18. टोमॅटो १ मध्यम
  19. ओलं खोबरं १/३ कप
  20. काजू १२ ते १५
  21. बडिशेप १ लहान चमचा
  22. जिरे १ लहान चमचा
  23. हिरवी मिरची २
  24. कोथिंबीर १ मोठा चमचा
  25. हळद १ लहान चमचा

सूचना

  1. सर्व प्रथम चिकन पाण्यात स्वच्छ करुन घ्या मग कोमट पाण्यात ठेवा
  2. मलबारी पेस्ट चे साहित्य तेलात चांगले भाजून घ्या व त्याची बारीक मऊ पेस्ट करुन घ्या
  3. आता एक खोलगट भांड घ्या त्यात तेल घालून तापवून घ्या
  4. मग मंद आच करुन कापलेले लसूण घालून परतवून घ्या
  5. मग गरम मसाला , धणे जिरे पावडर , लाल तिखट , मीठ , आलं लसूण पेस्ट घालून चांगल परतवून घ्या
  6. आता कोमट पाण्यातील चिकन,कडिपत्ते चिरलेला कांदा , टोमॅटो घाला व एकत्र करुन ७ ते ८ मि. वाफवून घ्या
  7. मग तयार मलबारी पेस्ट घालून मिश्रण एकजीव करुन घ्या
  8. खोबर्याच दूध घाला व झाकण ठेवून चिकन शिजवून घ्या
  9. आता तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता व भाजलेल्या बडिशेप पावडर घाला व मिश्रण एकजीव करा
  10. चिकन १ ते २ मि. मध्यम आचेवर परतवून घ्या मग आच बंद करा
  11. कोथिंबीर घाला व गरमागरम गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर