मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मटर मलाई( मलाई ग्रेवी)

Photo of Methi matar malai by Rohini Rathi at BetterButter
946
7
0.0(0)
0

मेथी मटर मलाई( मलाई ग्रेवी)

Jan-29-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मटर मलाई( मलाई ग्रेवी) कृती बद्दल

मलाई ग्रेव्हीमध्ये मेथी व वाटाणे घालून बनवलेली ही भाजी खाण्यास खूप चविष्ट लागतो

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाजीसाठी
  2. ताजे वटाणे एक कप
  3. मेथीचे पाने एक कप
  4. काजूचे तुकडे दोन टेबल स्पून
  5. सोडा चिमटीभर
  6. ग्रेव्हीसाठी
  7. कांदे दोन
  8. हिरवी मिरची दोन
  9. चार लसणाच्या पाकळ्या
  10. एक टिस्पून किसलेला आलं
  11. 10 ते 12 काजू
  12. दोन टेबल स्पून दही
  13. तूप दोन टेबल स्पून
  14. लाल मिरची पावडर एक टिस्पून
  15. काळी मिरी पावडर चिमूटभर
  16. गरम मसाला पाव टीस्पून
  17. मीठ चवीनुसार
  18. साखर चवीनुसार
  19. ताजी मलाई पाव कप
  20. दूध अर्धा कप

सूचना

  1. भाजी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात सोडा व वाटाणे उकडून घ्यावे
  2. वटाणा नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे नंतर त्यात मेथीची पाने घालून गॅस बंद करून घ्यावा
  3. दोन मिनिटांनंतर मेथी व वाटाण्याचे पाणी निथळून घ्यावे
  4. वाटण्यासाठी कांदा हिरवी मिरची लसूण-आलं काजू व दही मिक्सरमध्ये वाटून घ्यावे
  5. बारीक दळून ग्रेवी बनवून घ्यावे
  6. कढईत तूप गरम करून त्यात ग्रेवी टाकुन परतुन घ्यावी
  7. तूप सुटेपर्यंत मसाला परतून घ्यावे नंतर त्यात लाल मिरची काळी मिरची गरम मसाला मीठ साखर टाकून थोडा वेळ शिजू द्यावे
  8. नंतर मलाई घालावी
  9. दूध टाकून ग्रेव्ही उकळून घ्यावी
  10. ग्रेव्हीमध्ये उकडलेले वटाणे व मेथी मीठ घालून थोडावेळ शिजू द्यावे
  11. अशाप्रकारे तयार ग्रेव्ही पोळीबरोबर वाढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर