गट्टे का साग | Gatteka saag Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  29th Jan 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Gatteka saag by Rohini Rathi at BetterButter
गट्टे का सागby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

16

1

4 votes
गट्टे का साग recipe

गट्टे का साग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gatteka saag Recipe in Marathi )

 • बेसन पीठ एक कप
 • दही दोन टेबल स्पून
 • तेल एक टेबल स्पून
 • लाल मिरची पावडर एक टिस्पून
 • मीठ चवीनुसार
 • सबजी साठी
 • हिरवी मिरची दोन ते तीन
 • किसलेल्या आद्रक 1 टिस्पून
 • तेल दोन टेबल स्पून
 • मोहरी जिरे हिंग फोडणीसाठी
 • लाल मिरची पावडर दोन टीस्पून
 • हाळदी अर्धा टीस्पून
 • धना जिरा पावडर दोन टीस्पून
 • गरम मसाला पाव टीस्पून
 • मीठ चवीनुसार

गट्टे का साग | How to make Gatteka saag Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम बेसन दही तेल लाल मिरची पावडर एकत्र करून पाण्याने घट्ट पीठ मळून घ्यावे
 2. नंतर पिठाचे बोटाएवढे लांब मोठे रोल बनवून घ्यावे
 3. एका पातेल्यात तीन ते चार कप पाणी उकळून त्यात गट्टे टाकून पाच ते सात मिनिटे शिजवून घ्यावे
 4. पाण्या मधून गट्टे काढून मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावे
 5. कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जिरे हिंग घालून फोडणी घालावी नंतर त्यात लाल मिर्ची पावडर हळदी पावडर धने पावडर गरम मसाला घालून परतून घ्यावे
 6. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालावे व गट्टे घालून मिश्रण हलवून घ्यावे
 7. नंतर त्यात चवीनुसार मीठ व कोथंबीर घालून चमच्याने ढवळत राहावे
 8. अशाप्रकारे गट्टे ची सब्जी पोळी किंवा दाल बाटी चूर्मा बरोबर वाढा

My Tip:

ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी त्यात उकडलेल्या गट्टे चे पाणी घालावे

Reviews for Gatteka saag Recipe in Marathi (1)

Sagar Bhutada2 years ago

Reply