मुख्यपृष्ठ / पाककृती / खान्देशी स्पेशल शेव भाजी

Photo of Khandeshi special shev bhaji by Teesha Vanikar at BetterButter
2332
9
0.0(0)
0

खान्देशी स्पेशल शेव भाजी

Jan-29-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खान्देशी स्पेशल शेव भाजी कृती बद्दल

आमच्या खान्देश मध्ये ही शेव भाजी २प्रकारे केली जाते ,१प्रकारात शेव, भाजीतच चालू चालू झाऱ्याने पडली जाते आणि दुसऱ्या प्रकारात विकतची शेव आणून टाकली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कांदा
  2. १ छोटा टोमॅटो
  3. सुक्क खोबर अर्धा
  4. १तेजपत्र
  5. भाजीची लाल शेव १ वाटी
  6. ५ लसुण पाकळ्या
  7. २ चमचे डाळ्या
  8. १/२" आल्याचा तुकडा
  9. २ चमचे लाल तिखट
  10. २लाल सुक्या मिरच्या
  11. १चमचा खान्देशी गरम मसाला
  12. हळद अर्धा चमचा
  13. तेल ४ पळी
  14. जीरे १ छोटा चमचा
  15. मीठ चवीनुसार
  16. कोथिंबीर

सूचना

  1. खोबर किसून घ्या.
  2. कांदा टोमॅटो कापून घ्या.
  3. कांदा कढईत गुलाबी होई पर्यंत भाजून प्लेट मध्ये काढून घ्यावे.
  4. खोबर व दाळ्या ही गुलाबी होईपर्यंत भाजुन घ्यावे.
  5. लाल मिरच्या थोड तेल टाकून भाजुन त्यातच लसूण व आल भाजुन घ्या.
  6. सर्व भाजलेली सामग्री व टोमॅटो मिक्सर मध्ये वाटून घ्यावे
  7. कढई गॅसवर ठेवून त्यात तेल गरम करा,त्यात जीरे व तमालपत्र घाला.
  8. आता वाटण घालून चांगले परतावे, आजूबाजूने तेल सुटेपर्यंत.
  9. तेल सुटत आले की त्यात लाल तिखट, हळद व गरम मसाला घालून तयार मसाला परतावा.
  10. नंतर त्यात दिड पेला पाणी घालून रस्सा मंद आचेवर उकळू द्या.
  11. ५/६मी. भाजी उकळल्यावर गॅस बंद करावा.
  12. भाजी कोमट झाल्यावर त्यात शेव टाकावी व त्यात कोथिंबीर घालून, गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर