मसाला पुरी | Masala Puri Recipe in Marathi

प्रेषक Kushi's Kitchen  |  17th Feb 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Masala Puri by Kushi's Kitchen at BetterButter
मसाला पुरी by Kushi's Kitchen
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2197

0

मसाला पुरी recipe

मसाला पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala Puri Recipe in Marathi )

 • 1 वाटी - सुके वाटाणे
 • पुदिन्याची चटणी स्वादानुसार
 • काही पुऱ्या
 • सजविण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि सजविण्यासाठी तुमच्या आवडीची शेव
 • मीठ - स्वादानुसार
 • लाल तिखट - 2 लहान चमचे
 • चाट मसाला - 1 लहान चमचा
 • पुदिन्याची पाने - 2
 • कोथिंबीर - दोन दांड्या
 • वनस्पती तेल - 2 मोठे चमचे
 • लवंगा - 2
 • दालचिनी - अर्धा इंच
 • जिरे - 1 लहान चमचा
 • लसणाच्या पाकळ्या - 3
 • हिरवी मिरची - 1 (ऐच्छिक)
 • चिरलेला मोठा कांदा - 1
 • गाजर - 1
 • बटाटे - 2
 • खजुराची चटणी - स्वादानुसार

मसाला पुरी | How to make Masala Puri Recipe in Marathi

 1. हिरवे सुके वाटाणे रात्रभर भिजवून ठेवा. गाजर आणि बटाटे सोलून त्यांचे तुकडे करा. भिजवलेले वाटणे, गाजर आणि बटाटे प्रेशर कुकरमध्ये किंवा पॅनमध्ये पुरेसे पाणी घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
 2. आता पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे, लवंग, दालचिनी घालून काही सेकंद परता. आता त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घाला आणि बदामी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
 3. नंतर वाफवलेले आणि परतलेल्या घटकांचे मिश्रण, पुदिना आणि कोथिंबीरीसह मिक्सरमध्ये घालून मऊ पेस्ट करा. आता त्याला एका पॅनमध्ये हलवा. आवश्यकतेनुसार त्यात थोडेसे पाणी घाला, मग त्यात लाल तिखट आणि चाट मसाला घाला आणि एक उकळी येऊ द्या.
 4. एका वाढण्याच्या प्लेटमध्ये पुऱ्यांचा चुरा करा. तयार केलेली मसाला ग्रेव्ही घाला. (आवडत असेल तर चाट मसाला घालू शकता.) आता त्या ग्रेव्हीवर तुमच्या स्वादानुसार खजुर आणि पुदिन्याची चटणी घाला.
 5. तुमच्या आवडीनुसार चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि शेवने सजवा. मसाला पुरी आता तयार आहे.
 6. याला ताजी आणि गरमागरम वाढा आणि आनंद घ्या.

My Tip:

तुमच्या स्वादानुसार मसाले बदला. चटणी घाला आणि तुमच्या चवीनुसार सजवा. तुम्ही त्यात इच्छेनुसार किसलेले गाजर, डाळिंब, तिखट पूड आणि काळे मीठ देखील घालू शकता. गरम वाढल्यास हे चाट छान लागते, त्यामुळे वाढण्यापूर्वी रस्सा गरम करा.

Reviews for Masala Puri Recipe in Marathi (0)