मुख्यपृष्ठ / पाककृती / बांगडा करी

Photo of Bangda Curry by Aarti Nijapkar at BetterButter
4945
5
0.0(0)
0

बांगडा करी

Jan-30-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बांगडा करी कृती बद्दल

खर तर बांगडा हा आपल्या अगदीच जवळीक असलेला मासा, कित्येक प्रकारे बनवता येणारा असा हा बांगडा तर आज आपण झटकन होणारी एक रेसिपी करु.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • गोवा
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बेडगी मिरची ६ ते ७
  2. ओलं खोबरं १/३ कप
  3. कोकम ५ ते ६
  4. कांदा १ लहान
  5. लसूण पाकळ्या ४ ते ५
  6. कोथिंबीर १ मोठा चमचा
  7. धणे १ मोठा चमचा
  8. जिरे १ मोठा चमचा
  9. हळद १ लहान चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल २ मोठे चमचे
  12. कडिपत्ते ५ ते ६
  13. पाणी १/२ कप

सूचना

  1. दोन बांगडे घ्या
  2. बांगडा साफ करुन धूवून कापून घ्या
  3. बेडगी मिरची पाण्यात उकळून घ्या
  4. आता सर्व साहित्य व उकळलेली मिरची घ्या
  5. हे सर्व साहित्य मिक्सर च्या भांड्यात घाला
  6. पाणी घालून मसाला वाटून घ्या सर्व मसाले व्यवस्थित बारीक करुन घ्या
  7. पातेल्यात तेल तापवून घ्या व कडिपत्ते घाला
  8. वाटलेला मसाला तेलात घालून व्यवस्थित परतवून घ्या
  9. आता कोकम घालून एकत्र करुन घ्या
  10. पाणी घालून मसाला एकजीव करुन घ्या
  11. चांगली उकळ येऊ द्या
  12. आता बांगड्याचे तूकडे घाला
  13. मिश्रण एकजीव करुन ५ ते ६ मि. उकळून घ्या
  14. मग गरमागरम बांगडा करी तयार
  15. तांदळाची भाकरी , चपाती किंवा भाता सोबत बांगडा करी खाऊ शकतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर