फालूदा | Falooda Recipe in Marathi

प्रेषक Anusha Praveen  |  17th Feb 2016  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Falooda by Anusha Praveen at BetterButter
फालूदाby Anusha Praveen
 • तयारी साठी वेळ

  70

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3468

1

फालूदा recipe

फालूदा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Falooda Recipe in Marathi )

 • दूध 500 मिली.
 • साखर अर्धी वाटी
 • 4 मोठे चमचे फालुद्याच्या नायलॉन शेवया
 • 3/4 वाटी संमिश्र फळे जसे, केळी, डाळिंब, सफरचंद, बेरीज, द्राक्षे वगैरे.
 • 4 मोठे चमचे मिश्र सुके मेवे (बदाम, काजू, बेदाणे)
 • व्हॅनिला इसेन्स 1 लहान चमचा
 • 2 मोठे स्कूप व्हॅनिला आईसक्रिम
 • 1 मोठा चमचा सब्जाच्या बिया अर्धा कप पाण्यात भिजवलेले
 • 2 मोठे चमचे गुलाबाचे सिरप

फालूदा | How to make Falooda Recipe in Marathi

 1. सब्जाच्या बिया अर्धा कप पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवा.
 2. तोपर्यंत फालुद्याच्या शेवया पॅकेटवर दिलेल्या सूचनेप्रमाणे शिजवून घ्या. पाणी निथळून थंड होऊ द्या.
 3. दूध उकळवा आणि दूध गरम असेल तेव्हा साखर घाला. आता पूर्ण पणे थंड होऊ द्या.
 4. दुधात गुलाबाचे सिरप नीट मिसळा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
 5. चिरलेली फळे देखील फ्रीजमध्ये ठेवा.
 6. फालुदा तयार करण्यासाठी, दोन मोठे ग्लास हवेत.
 7. फळे, सुके मेवे, आईसक्रिम, सब्जाच्या बिया आणि फालुद्याच्या शेवया यांचे दोन भाग करा.
 8. फळे ग्लासात तळाशी ठेवा.
 9. आता त्यात शेवया घाला.
 10. नंतर आईसक्रिम घाला.
 11. आता सब्जाच्या बिया घाला.
 12. नंतर सुके मेवे आणि बेदाणे घाला.
 13. आता कडेने ग्लासात हळू-हळू फ्लेवर्ड दूध घाला.
 14. दुसऱ्या ग्लासात देखील असेच करा.
 15. इच्छेनुसार भरपूर चॉकलेट आणि शेवया घाला. एका चमच्याबरोबर थंडगार फालूदा वाढा.

My Tip:

एका वेगळ्या चवीसाठी वेगळ्या स्वादांचे आईसक्रिम वापरा.

Reviews for Falooda Recipe in Marathi (1)

tejswini dhoptea year ago

Chan
Reply

Cooked it ? Share your Photo