Photo of Mutton liver Sagoti by Nayana Palav at BetterButter
1459
10
0.0(6)
0

Mutton liver Sagoti

Jan-31-2018
Nayana Palav
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • गोवा
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. मटण कलेजी १/२ किलो
  2. तेल ४ टेबलस्पून
  3. हळद १/४ टीस्पून
  4. हिंग १/४ टीस्पून
  5. मोहरी १/४ टीस्पून
  6. कढीपत्ता ६ पाने
  7. कांदे २
  8. सुके किंवा ओले खोबरे १ वाटी
  9. आले १/२ इंच
  10. लसूण ६ पाकळया
  11. लंवग ४
  12. मिरी ४
  13. धणे १ टेबलस्पून
  14. जिरे १/२ टीस्पून
  15. खसखस १ टीस्पून
  16. बडीशेप १/२ टीस्पून
  17. जायफळ पूड १/४ टीस्पून
  18. जायपत्री १/२
  19. मोठी वेलची १
  20. हिरवी वेलची २
  21. कोंथिबीर १ मूठ
  22. लाल मिरची पावडर २ टेबलस्पून
  23. मालवणी मसाला किंवा तुमच्या घरातील कोणताही मसाला १ टेबलस्पून
  24. पाणी आवशयकतेनुसार

सूचना

  1. प्रथम कलेजी स्वच्छ धुवुन घ्या.
  2. आलं व लसूण मिक्सरला पेस्ट करून घ्या.
  3. १ कांदा बारीक चिरा.
  4. कढई गरम करत ठेवा.
  5. कढईत तेल ओता.
  6. तेल गरम झाले की त्यात हळद, हिंग, मोहरी, कढीपत्ता घाला.
  7. आता कांदा घाला.
  8. कांदा गुलाबी झाला की आल लसूण पेस्ट घाला.
  9. पेस्ट थोडी परतून घ्या, कच्चेपणा गेला पाहीजे.
  10. आता लाल मिरची पावडर घाला.
  11. मीठ घाला.
  12. आता कलेजी घाला.
  13. सगळे मिश्रण नीट परतून घ्या.
  14. झाकण ठेवून शिजू दया.
  15. दुसरी एक कढई गरम करत ठेवा.
  16. त्यात १ टेबलस्पून तेल घाला.
  17. सगळे खडे मसाले परतून घ्या.
  18. आता १ कांदा उभा चिरून घाला.
  19. कांदा गोल्डन ब्राउन होइपर्यंत परतून घ्या.
  20. आता कांदयावर खोबरे घाला.
  21. खोबरे तपकीरी रंग येइपर्यंत परतून घ्या.
  22. आता कांदा, खोबरे याचे मिश्रण मिक्सरला वाटून घ्या.
  23. कलेजी शिजल्यावर त्यात कांदा खोबरयाची पेस्ट घाला.
  24. थोडे शिजू दया.
  25. तयार आहे तुमची चविष्ट मटण कलेजी ची सागोती.
  26. भात, चपाती, भाकरी, वडे याबरोबर वाढा.

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Mar-14-2018
deepali oak   Mar-14-2018

Mast

Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

Tempting:yum::yum::yum:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर