मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबट तिखट बोंबील रस्सा

Photo of Aambat Tikhat Bombil Rassa by Aarti Nijapkar at BetterButter
1058
4
0.0(0)
0

आंबट तिखट बोंबील रस्सा

Jan-31-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबट तिखट बोंबील रस्सा कृती बद्दल

बोंबील म्हणजे बॉम्बे डक तर अगदी सर्वांच्या घराघरात बनणारा मासा. शिजायला जास्त वेळ न घेणारा व कोणत्याही प्रकारे चवीष्ट असा बोंबील मासा. तर चला आज आपण करु आंबट तिखट बोंबील रस्सा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बोंबील ४ मध्यम आकाराचे
  2. कोकम ७ ते ८
  3. ओलं खोबरं १/४ कप
  4. हिरव्या मिरच्या ५ ते ६
  5. कोथिंबीर २ मोठे चमचे
  6. आल १/२ इंच
  7. लसूण पाकळ्या ५ ते ६
  8. कांदा १ खूप लहान
  9. जिरे १ लहान चमचा
  10. धने १ मोठा चमचा
  11. हळद १ लहान चमचा
  12. मीठ स्वादानुसार
  13. तेल ३ मोठे चमचा
  14. पाणी इच्छेनुसार

सूचना

  1. बोंबील मासे घ्या
  2. साफ करुन स्वच्छ धूवून घ्या मग त्याचे तूकडे कापा
  3. एका ताटात ठेवा हळद व मीठ लावू ठेवा
  4. आता सर्व साहित्य घ्या
  5. कोथिंबीर , हिरव्या मिरच्या , ओल खोबरं , आल , लसूण , कांदा , धने , जिरे , हळद व स्वादानुसार मीठ घालून मिक्सर मध्ये वाटून घ्या
  6. थोडसं पाणी घालून बारीक अशी पेस्ट बनवून घ्या
  7. पातेल्यात तेल घालून गरम होऊ द्या मग कडिपत्ते व वाटलेला मसाला घाला
  8. तेल सूटे पर्यंत परतवून घ्या
  9. कोकम घालून ४ ते ५ मि. वाफवून घ्या
  10. मग गरम पाणी घालून उकळी येऊ द्या
  11. मसाला व्यवस्थित शिजला म्हणजे मिरचीचा तिखट पणा गेल्यावर बोंबील चे तूकडे घाला
  12. मग ३ ते ४ मि. बोंबील शिजवून घ्या
  13. बोंबीलला शिजायला फार वेळ लागत नाही तर गरमागरम गरम आंबट तिखट बोंबील रस्सा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर