पाव भाजी | Pav bhaji Recipe in Marathi

प्रेषक Nandita Shyam  |  17th Feb 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Pav bhaji by Nandita Shyam at BetterButter
पाव भाजी by Nandita Shyam
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5610

0

Video for key ingredients

 • Pav Buns

पाव भाजी recipe

पाव भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pav bhaji Recipe in Marathi )

 • भाजीसाठी :
 • 3 टेबल स्पून - बटर
 • 1 बारीक चिरलेला मोठा - कांदा
 • 1 टी स्पून - आल्ले - लसूण पेस्ट
 • 2 मोठे बटाटे - साली काढलेले आणि चौकोनी तुकडे केलेले
 • 1 मोठे गाजर - साली काढलेले आणि चौकोनी तुकडे केलेले
 • 10 फ्रेंच बीन्स - चिरलेल्या
 • फ्लाॅवरची सुमारे 12-15 फुले
 • हिरवे मटार - 1/2 कप
 • 1 सिमला मिरची - बारीक चिरलेली
 • 3 टोमॅटो, 1 बारीक चिरलेला आणि 2 ची प्युरी
 • चवीनुसार - मीठ
 • साखर - 1/2 टी स्पून
 • 1/4 टी स्पून - हळद
 • लाल मिरची पावडर - 1 टी स्पून
 • पाव भाजी मसाला - 1 टेबल स्पून
 • काळे मीठ - 1/2 टी स्पून
 • सजावटीसाठी कोथिंबीर
 • पावासाठी :
 • 8 - 10 लादी पाव
 • पाव भाजण्यासाठी बटर
 • पाव भाजी मसाला ( ऐच्छिक )
 • खायला देण्यासाठी :
 • 1 मोठा कांदा - बारीक चिरलेला
 • सजावटीसाठी कोथिंबीर - 1 टेबल स्पून
 • 2 - लिंबूचे केलेले तुकडे

पाव भाजी | How to make Pav bhaji Recipe in Marathi

 1. भाजी बनविण्यासाठी :
 2. जाड तळाच्या पॅनमध्ये बटर गरम करावे आणि त्यामध्ये चिरलेला कांदा घालावा. तो अर्धपारदर्शक झाल्यावर त्यात आल्ले - लसूण पेस्ट घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत तळावे.
 3. आता बटाटे, गाजर, बीन्स आणि मटार घालून ते शिजेपर्यंत तळावे.
 4. त्यामध्ये फ्लॉवरची फुले, चिरलेली सिमला मिरची, मीठ, साखर, हळद व लाल मिरची पावडर घालून हलवत रहावे आणि 3-4 मिनिटे परतावे.
 5. चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटोची प्युरी टाकून व्यवस्थित मिसळून घ्यावे , अडीच कप पाणी टाकून भाज्या पूर्ण शिजेपर्यंत झाकून ठेवावे.
 6. बटाटे मॅशरने मिश्रणाचा लगदा करावा. पाव भाजी मसाला व काळे मीठ घालून आणखी थोडा वेळ लगदा करावा.
 7. भाजी आणखी 5 मिनिटे मंद आचेवर शिजवावी. भाजी जास्त घट्ट वाटल्यास त्यात अर्धा कप पाणी टाकावे, भाजी अजून 2 मिनिटे शिजवावी .
 8. तयार भाजी कोथिंबीरीने सजवावी आणि कुरकुरीत भाजलेल्या पावासोबत गरमागरम खायला द्यावी .
 9. पावासाठी :
 10. पाव समांतर कापून पावाच्या आतील बाजूस भरपूर बटर लावावे.
 11. अगोदर गरम केलेल्या तव्यावर बटर लावलेली पावाची बाजू ठेवावी आणि तो तांबूस व कुरकुरीत होईपर्यंत भाजावे.
 12. आता पाव बंद करून दुसर्‍या बाजूने चांगला भाजावा. गरज वाटल्यास आणखी बटर लावावे.
 13. खायला देण्यासाठी :
 14. 1 कप भाजी घ्यावी , दोन कुरकुरीत पाव ठेवावेत , चिरलेला कांदा आणि लिंबूचे तुकडे प्लेटमध्ये ठेवावेत.
 15. भाजीच्या वरील बाजूस जास्तीचे बटर घालावे आणि गरज वाटली तर पाव भाजी मसाल्यासोबत कोथिंबीरीने सजवून गरमागरम खायला द्यावी .

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Pav bhaji Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo