उपमा | Upma Recipe in Marathi

प्रेषक Chandrima Sarkar  |  28th Jul 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Upma by Chandrima Sarkar at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3514

0

उपमा recipe

उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upma Recipe in Marathi )

 • सुजी/ रवा (भाजलेला) - 1 वाटी
 • कांदा (मध्यम आकाराचा) - 1 (बारीक चिरलेला)
 • हिरवी मिरची - 1 ते 2 (बारीक चिरलेली)
 • काजू - 2 मोठे चमचे
 • उकडलेला बटाटा - 1 मध्यम आकाराचा (छोट्या चौकोनी तुकड्यांमध्ये)
 • साखर - 1 लहान चमचा (पर्यायी)
 • वनस्पती तेल - 2 मोठे चमचे
 • मीठ
 • फोडणीसाठी- चणाडाळ - 2 मोठे चमचे
 • उडीद डाळ- 1 मोठा चमचा
 • काळी मोहरी - अर्धा लहान चमचा
 • जिरे - अर्धा लहान चमचा
 • कडीपत्ता - 2 काड्या

उपमा | How to make Upma Recipe in Marathi

 1. एका फ्रायिंग पॅनमध्ये काजू हलक्या बदामी रंगाचे होईपर्यंत मध्यम ज्वालेवर भाजून घ्या. त्याला उतरवा आणि बाजूला ठेवून द्या.
 2. तेल गरम करा आणि फोडणीसाठी सांगितलेली सर्व सामग्री त्यात घाला. आता, त्यात चिरलेला कांदा घाला आणि मध्यम विस्तवावर बदामी रंगाचे होईपर्यंत तळा. त्यानंतर त्यात सुजी, मीठ आणि हिरव्या मिरच्या घाला आणि चांगल्या तऱ्हेने मिसळा. आता 1/4 कप पाणी घाला आणि थोडे आणखी पाणी घालून ते मिसळा. मंद विस्तवावर ते शिजवा, अधूनमधून हलवित रहा. काही मिनिटांनंतर थोडे आणखी पाणी घाला.
 3. आता काजू आणि साखर घाला आणि मिसळा. नंतर सुजी मुलायम होईपर्यंत शिजवा. अखेरीस तुम्हाला मुलायम आणि ओलसर मिश्रण मिळेल, म्हणजेच उपमा तयार आहे. त्याला खाली उतरवा. ताबडतोब वाढा.

My Tip:

तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही लोणच्यासोबत हे खाऊ शकता.

Reviews for Upma Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo