Photo of Palak paneer by pranali deshmukh at BetterButter
773
7
0.0(0)
0

पालक पनीर

Feb-03-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पनीर कृती बद्दल

पालकामध्ये आयर्न व्हिटॅमिन a b असते आणि पनीरमध्ये भरपुर प्रोटीन .जर हे दोन्ही एकत्र आले तर एक पौष्टिक भाजी आपल्याला जेवणात मिळेल .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 पाव पालक
  2. 200 gr पनीर
  3. 1 कांदा मोठा
  4. 1 टोमॅटो
  5. 1 tbsp अद्रक लसूण पेस्ट
  6. 2 हिरव्या मिरच्या
  7. 2 tbsp तिखट
  8. 1/2 tbsp हळद
  9. मीठ
  10. 2 डाव तेल
  11. 1/2 मोहरी

सूचना

  1. पालकाची पाने तोडून धुवून घ्या .
  2. पालक एका पॅनमध्ये 5 मिनिट उकळून घ्या .
  3. कांदा आणि टमाटर कापून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या .
  4. उकळलेले पालक आणि हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घ्या.
  5. एका भांड्यात पाणी कोमट करा तयात किंचित मीठ घाला त्या कोमट पाण्यात 5 मिनिट पनीर ठेवा .नंतर चाकूने तुकडे कापा .
  6. पॅनमध्ये मोहरी घाला मोहरी तडतडली कि कांदा टोमॅटो पेस्ट ,अद्रक लसूण पेस्ट घाला .
  7. तेल सुटायला आलं कि तिखट ,हळद ,मीठ ,गरम मसाला घाला .
  8. आता पालकाची प्युरी घाला .एक दोन उकळी आल्या कि पनीरचे तुकडे टाका .पाच मिनिटांनी गॅस बंद करा.
  9. पालक पनीर चपाती ,तंदुरी रोटी ,भात यापैकी सोबत सर्व्ह करा.
  10. सर्व्ह करताना वरून क्रिमने गार्निश करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर