Photo of Patodi by pranali deshmukh at BetterButter
874
5
0.0(0)
0

पाटोडी

Feb-03-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाटोडी कृती बद्दल

गरजेच्या￰ वेळेला धावून येणारी भाजी म्हणजे पाटोडी . घरात असणाऱ्या जिन्नसांचा वापर करून हि भाजी बनवतात .जेवणाच्या ताटात पाटोडी असली कि दुसऱ्या भाजीची गरजच भासत नाही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 वाटी बेसन
  2. 25gr सुकं खोबरं
  3. 1 कांदा
  4. 2 चमचे धने
  5. 2 चमचे खसखस
  6. 1/2 इंच कलमी
  7. 1 चमचा दगडफूल
  8. 1 बडी इलायची
  9. 1 तमालपत्र
  10. 2 डाव तेल
  11. मोहरी 1/2 tbsp
  12. जिरे 1/2 tbsp
  13. 2 चमचे तिखट
  14. 1 चमचा हळद
  15. मीठ
  16. कोथिंबीर एक चमचा

सूचना

  1. बेसनात मीठ ,तिखट ,हळद ,बा चिरलेला कोथिंबीर 1 चमचा तेल घालून छान घट्ट मळून घ्या .
  2. कांदा उभा चिरून थोड्या तेलात भाजून घ्या .अशाचप्रकारे ,खोबरे ,धने ,खसखस ,सर्व खडे मसाले भाजून घ्या.
  3. कान्दा ,धने ही पेस्ट मिक्सरमधून काढा
  4. खोबरे खसखस हि दुसरी पेस्ट
  5. बाकी खडा मसाला तिसरी पेस्ट वाटून घ्या .
  6. लसूण अद्रक पेस्ट बनवलेलीच आहे.
  7. कढईत तेल घाला तेल तापलं कि मोहरी ,जिरे घाला.
  8. लसूण अद्रक पेस्ट घाला आणि थोडं परतवा .
  9. आता कांदा पेस्ट ,खोबरं पेस्ट ,आणि खडा मसाला घाला छान मिक्स करा .
  10. आता तिखट ,हळद ,मीठ घाला ,एक ग्लास गरम पाणी घालून उकळी येऊ द्या .तोपर्यंत पातोडीचा भिजवलेला गोळा पोळीसारखा लाटा ,
  11. चाकूने चकोनी वड्या पाडा .खूप पातळ नको.
  12. उकळत्या रश्यात पातोडी टाका .मिक्स करा ,गरम मसाला आणि कोथिंबीर घाला .झाकण ठेवून 10 मिनिट शिजू द्या .
  13. पाटोडी शिजली कि वर तरंगते
  14. भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर