मोदक करी | Modak curry Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  3rd Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Modak curry by Maya Ghuse at BetterButter
मोदक करीby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

1 vote
मोदक करी recipe

मोदक करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Modak curry Recipe in Marathi )

 • बेसन 1 वाटी
 • तिळ 4चमचे
 • खोबरं अर्धी वाटी
 • कांदा 2
 • आलं-लसूण पेस्ट 2चमचे
 • चिंच
 • गूळ
 • तिखट 4 चमचे
 • हळद अर्धा चमचा
 • धना पावडर अर्धा चमचा
 • मिरे पूड अर्धा चमचा
 • मिठ
 • तेल 2वाटी तळण्याकरीता

मोदक करी | How to make Modak curry Recipe in Marathi

 1. एका वाट्यात बेेसन घेवून त्यात 1चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ, भाजून बारिक केलेल जिरं तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
 2. तिळ, खोबर भाजून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
 3. कांदा कापून तेलातून परतला 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ, मिरंपूड घेतले
 4. सर्व एकत्र केले, सारण तयार झालं
 5. बेसनाच्या छोटे गोळे करून लाटून घेतले त्यात सारण भरून मोदक बनविले
 6. तेलात तळून घेतले
 7. कांदा -खोबरं तेलात परतवून मिक्सरमधून वाटून घेतले, आलं-लसूण पेस्ट, चिंच-गूळ पाण्यात भिजत घातला, 2चमचे तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर मीठ घेतले
 8. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली व वरील सर्व त्यात 1-1 टाकून परतले शेवटी चिंच-गूळाच पाणी घालून आवश्यक तेवढे पाणी टाकून उकळी घेतली आणि मोदक टाकले
 9. मोदक टाकून उकळी घेऊन कोथिंबीर घालून वाढले

My Tip:

मोदक तेलात न तळता चाळणीत वाफवून घेतले तरी छान होतात.

Reviews for Modak curry Recipe in Marathi (0)