मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली कारली

Photo of Bharleli karali by pranali deshmukh at BetterButter
2072
5
0.0(0)
0

भरलेली कारली

Feb-03-2018
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली कारली कृती बद्दल

￰कडू कारलं तुपात तळलं साखरेत घोळल तरी ते कडूच अशी म्हण आहे .कारलं कडू असलं तरी खूप गुणवर्धक आहे .त्याचा कडूपणा मधुमेह असणार्यांनाच नाही तर प्रत्येकाला उपयुक्त आहे .स्टफ कारली खूप छान लागतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 पाव कारली
  2. 1/4 वाटी शेंगदाणे आणि तीळ कूट
  3. 2 कांदे बारीक चिरलेले
  4. धने पावडर 4 चमचे
  5. गरम मसाला 2 चमचे
  6. थोडा गूळ
  7. तिखट 3 tbspचमचे
  8. हळद 1 tbsp
  9. मीठ
  10. लसूण अद्रक जिरे पेस्ट 2 tbsp
  11. तेल 2 डाव

सूचना

  1. कारली धुवून घ्या .वरील हिरवी साल सोलरनी हलकेच सोलून घ्या .
  2. मीठ आणि लिंबू रस लावून एक तास ठेवा .
  3. नंतर दोन तीन पाण्यानी धुवा .जरकडू चालत असेल तर एकदा धुतले आणि पिळले तरी चालेल.
  4. एका बाजूने चिरून आतमध्ये मसाला भरायला जागा करा .बियाअसतील तर काढून टाका.
  5. शेंगदाणे तीळ कूट ,तिखट 1 चमचा मीठ ,गरम मसाला , धने पूड ,बारीक चिरलेला कांदा एकत्र मिक्स करा .कांदा थोडा फोडणीसाठी ठेवा.
  6. सर्व मसाला कारल्यामध्ये भरा.
  7. कढईत तेल घाला तेल गरम झालं कि मोहरी घाला .मोहरीतडतडली कि कांदा ,लसूण जिरे पेस्ट घसळून परतवा.
  8. आता तिखट ,हळद ,मीठ ,घाला 1/2 वाटी पाणी घाला भरलेली कारली ठेवा .गूळआणि गरम मसाला घाला मिक्स करा .झाकण ठेवून शिजू द्या .
  9. भरलेली कारले रेडी .पोळीभाकरी सोबत सर्व्ह करा.
  10. मी पांढरी कारली घेतली .हिरव्या कारल्याची भाजी खालील पिकमध्ये आहे .
  11. कारली वांग्यासारखी कापूनही मसाला भरता येतो .ती कारली धाग्यांनी बांधावी लागतात.म्हणजे मसाला बाहेर येत नाही.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर