मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर बटर मसाला

Photo of Paneer butter masala by pranali deshmukh at BetterButter
1096
3
0.0(0)
0

पनीर बटर मसाला

Feb-03-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर बटर मसाला कृती बद्दल

आपल्याला नेहमीच काही सेलेक्टड भाज्या त्यांच्या रंगामुळे आकर्षित करतात .म्हणूनच बाहेरच जेवण फारच हौशीने आणि स्तुतिसंपन्न गप्पांनी आपण एन्जॉय करतो .पण त्यांचा रंग नैसर्गिक नसतो ...विशिष्ट रंग यावा यासाठी नक्कीच आर्टिफिशिअल रंगांचा वापर होतो ...आपण नैसर्गिक रंगाचा वापर करून जर भाज्या बनवल्या तर .....बच्चे भी खुश ....बच्चोके पापा भी खुश ...... बटर पनीर मसाला ..... माझ्या नारंगी रंगाचं रहस्य जाणायच तुम्हाला .....ग्रेव्ही तयार करताना त्यामध्ये थोडं बीटरूट चिरून टाका .... बस एक तुकडा बिट रूट ...लाल गर्द बीटामध्ये जेव्हा हळद एकरूप होते तेव्हा ....बटर पनीर सारख्या भाज्यांची चवही वाढते आणि रंगही आकर्षित करतो .....दिसणं आणि असणं दोन्ही गोष्टी जीवनात आणि जेवणात खूप महत्वाच्या असतात ......तर करा हा प्रयोग ...एकदम बिनधास्त ..... तुमची मुलं नक्कीच म्हणतील आई भाजी अगदी हॉटेल स्टाईल झाली ....

रेसपी टैग

  • व्हेज
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 200 gr पनीर
  2. 6 -7 काजू
  3. 10gr. मगज
  4. 1 कांदा
  5. 2 टोमॅटो
  6. 1 tbsp मिरची￰ पावडर
  7. 1/2 tbsp हळद
  8. मिठ
  9. 2 tbsp बटर
  10. 1/2 tbsp साखर
  11. छोटा बीटचा तुकडा
  12. 1 कप दूध

सूचना

  1. काजू ,मगज एक तास पाण्यात भिजत घाला.
  2. कांदा उभा चिरून तेलात गुलाबी तळून घ्या.
  3. मिक्सरमधून पेस्ट काढा
  4. टमाटर बॉईल करा.वरची साल काढून मिक्सरमध्ये प्युरी बनवा
  5. काजू मगज पेस्ट काढा.त्यातच बिट वाटून घ्या.
  6. पॅन मध्ये बटर घाला कांदयाची पेस्ट परतवा .नंतर टोमॅटो प्युरी घाला ,नंतर काजू मगज पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतवा.
  7. तिखट ,हळद ,मीठ ,साखर घाला ,दूध घालून ग्रेव्ही बनवा .
  8. पनीर कोमट मिठाच्या पाण्यात पाच मिनिट ठेवा म्हणजे सॉफ्ट होईल .चाकूने तुकडे कापून ग्रेव्हीमध्ये घाला .एक उकळी येऊ द्या झाकण ठेवा .
  9. तंदुरी रोटी , नान बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर