मुख्यपृष्ठ / पाककृती / PUDACHI vafavleli rassa vadi

Photo of PUDACHI vafavleli rassa vadi by Chayya Bari at BetterButter
608
13
0.0(2)
0

PUDACHI vafavleli rassa vadi

Feb-04-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पारी साठी
  2. बेसन ३वाट्या
  3. तिखट २चमचे
  4. हळद १चमचा
  5. मीठ चवी नुसार
  6. तीळ १चमचा
  7. आले लसूण पेस्ट १चमचा
  8. तेल थोडेसे
  9. सारण
  10. खोबरे किस २वाट्या
  11. बारीक कापलेली कोथिंबीर १वाटी
  12. तीळ ३चमचे
  13. धणेपूड १चमचा
  14. खसखस १चमचा
  15. तिखट,मीठ,गरम मसाला चवीसाठी
  16. रस्सा वाटण
  17. आले, लसूण,कोथिंबीर,कढीपत्ता
  18. कांदा१
  19. खोबरे किस ५चमचे
  20. जिरे,मोहरी,हिंग,तमालपत्र फोडणीसाठी
  21. तिखट, २चमचे
  22. काळा मसाला ३चमचे
  23. मीठ चवीसाठी
  24. हळद १चमचा
  25. कापलेली कोथिंबीर सजावटीसाठी
  26. तेल

सूचना

  1. प्रथम तयारीत खोबरे्किस,खसखस,तिळ भाजून घ्यावी शेवटी कोमट कढईत कोथिंबीर टाकून परतावी कढई फार गरम नको
  2. मग त्यात२चमचे बेसन तेलात खरपूस भाजून घ्यावे
  3. त्यात तिखट मीठ हळद धणेपूड तीळ खसखस गरम मसाला घालून सारण बनवावे
  4. मग कांदा खोबरे भाजून आले लसूण कोथिंबीर कढीपत्ता घेऊन वाटणं करावे
  5. तेल तापवून जिरे मोहरी हिंग तमालपत्र घालून फोडणी करावी
  6. त्यात तिखट हळद कला मसाला मीठ घालून परतावे व वाटणं घालावे
  7. तेल सुटल्यावर पाणी पाहिजे तसे घालून रस्सा उकळून घ्यावा
  8. मग बेसनात तिखट मीठ हळद तीळ व तेल घालून घट्ट भिजवावे
  9. मग त्याची पोळी लाटून त्यावर सारण भरून रोल बनवावा
  10. मग ते रोल चाळणीवर ठेवून २०मिनिटे वाफवून घ्यावे
  11. गार झाल्यावर वड्या कापून रस्सा घालून वाढाव्या

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maya Ghuse
Feb-06-2018
Maya Ghuse   Feb-06-2018

Supper

Vijay Bari
Feb-05-2018
Vijay Bari   Feb-05-2018

खुप छान

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर