मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार हरियाली

Photo of Matar Hariyali by Purva Sawant at BetterButter
841
5
0.0(0)
0

मटार हरियाली

Feb-04-2018
Purva Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार हरियाली कृती बद्दल

हिरव्या रस्श्यातला मटार गरम गरम पोळी बरोबर खूप छान लागतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • मुघलाई
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. मटार- १ कप
  2. कांदा, चिरून- १ मध्यम
  3. टोमॅटो, मोठे तुकडे करून - १ (ऐच्छिक
  4. हळद- १/४ टीस्पून
  5. हिंग- १/४ टीस्पून
  6. तेल- २ टेबलस्पून
  7. बटर- १ ते २ टेबलस्पून
  8. चीज किंवा पनीर- सजावटीसाठी (ऐच्छिक)
  9. कोथिंबीर- मुठभर
  10. लसुण- ५ ते ६ पाकळ्य़ा
  11. आलं- अर्धा इंच
  12. काजू तुकडा- ३ टेबलस्पून
  13. हिरवी मिरची- ३ ते ४
  14. मिरे- ४ ते ५
  15. साखर- चिमुटभर
  16. मिठ- चवीनुसार
  17. लिंबाचा रस- २ टेबलस्पून

सूचना

  1. पाणी उकळत ठेवा. त्यात चिमुटभर खायचा सोडा टाका. त्या पाण्यात मटार टाका. १ मिनिटानंतर आच बंद करून मटार चाळणीत ओता. त्यावर थंड पाणी घाला. म्हणजे मटारचा हिरवा रंग कायम राहील.
  2. कोथिंबीर, लसुण, आलं, काजू तुकडा, हिरवी मिरची, जिरे, बडीशेप, दालचीनी, लवंग, हिरवी वेलची, मिरे, मिठ, साखर व लिंबाचा रस हे सर्व एकत्र पाणी घालुन वाटुन घ्या
  3. पॅन मध्ये तेल व बटर एकत्र गरम करा. त्यात कांदा गुलाबी होइसतोपर्यंत परता. हिंग व हळद घालुन जरास परता. 
  4. मग वाटण घालुन तेल सुटेपर्यंत परता.
  5. मटार घालुन ज्या प्रमाणात रस्सा हवा तसे गरम पाणी घाला. चव घेऊन मिठ कमी जास्त बघा
  6. टोमॅटो घाला आणि झाकण ठेऊन ७ ते १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
  7. सजावटीसाठी वरून चीझ किंवा पनीर किसून टाकावे.
  8. गरमागरम चपाती, फुलके, नानबरोबर छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर