पापड नाचोज | Papad Nachos Recipe in Marathi

प्रेषक Gagandeep Joshi  |  22nd Feb 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Papad Nachos by Gagandeep Joshi at BetterButter
पापड नाचोज by Gagandeep Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

869

0

Video for key ingredients

 • How To Make Pizza Dough

पापड नाचोज recipe

पापड नाचोज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Papad Nachos Recipe in Marathi )

 • 4 लिज्जत पापड (कोणत्याही स्वादाचे, शक्यतो पंजाबी तडका असलेले पहा)
 • 2 मोठे चमचे लाल राजमा (शिजवलेले)
 • 1 कांदा (बारीक चिरलेला)
 • 1 मोठा चमचा आले-लसूण वाटलेले
 • 1 टोमॅटो (बारीक चिरलेला)
 • 1 मोठा चमचा कोथिंबीर (बारीक चिरलेली)
 • 1 मोठा चमचा कांद्याची पात (बारीक चिरलेली)
 • 1 लहान चमचा लाल तिखट
 • 1 मोठी लाल भोपळा मिरची (बारीक चिरलेली)
 • 1 मोठा चमचा तीळ
 • मीठ स्वादानुसार
 • टॉपिंगसाठी 1 मोठा चमचा लिंबाचा रस
 • सजविण्यासाठी अर्धी वाटी चिरलेले जलापेनोज, चिरलेला कांदा आणि टोमॅटो (ऐच्छिक)
 • वाढण्यासाठी पुदिना मेयोनीजचा मोठा तुकडा घ्या

पापड नाचोज | How to make Papad Nachos Recipe in Marathi

 1. एका ताटात पापड रचून ठेवा आणि तयार होईपर्यंत एक ते अर्धा मिनिट मायक्रोवेवमध्ये गरम करा
 2. गरम असतानाचा त्यांना पिझ्झा कटरने त्रिकोणी आकारात कापा आणि बाजूला ठेवा.
 3. एका मोठ्या वाडग्यात राजमा, कोथिंबीर, कांद्याची पात आणि लाल भोपळा मिरची एकत्र करा. मिश्रण नीट हलवा.
 4. एका कढईत तेल गरम करा. त्यात कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत परता.
 5. आता त्यात वाटलेले आले-लसूण, लाल तिखट, टोमॅटो आणि मीठ घाला. एकजीव करा आणि टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवा.
 6. एक सॉससारखे घट्ट झाले की गॅस बंद करा आणि मिश्रणाला सामान्य तापमानावर थंड होऊ द्या.
 7. आता राजमाच्या मिश्रणात हे घाला आणि सर्व एकजीव होईपर्यंत नीट हलवा. तुमचे सालसा सॉस तयार आहे!
 8. वाढण्यासाठी मध्यभागी चमचा भरून सालसा सॉस ठेवा आणि त्रिकोणी पापड कडेने ठेवा. जलापेनोज, कांदा, टोमॅटो, कांद्याची पात आणि थोडा लिंबाचा रस यांनी सजवा.
 9. पुदिना मेयोनीजच्या मोठ्या तुकड्याबरोबर ताबडतोब वाढा.

My Tip:

पापडाऐवजी तुम्ही कोणतेही चिप्स वापरू शकता. तसेच, नाचोज मूलतः स्वादिष्ट असतात त्यामुळे इच्छित स्वाद आणि आवडींनुसार घटक जोडू किंवा कमी करू शकता.

Reviews for Papad Nachos Recipe in Marathi (0)