कॉलिफ्लॉवर 65 (कोबी 65) | Cauliflower 65 (Gobi 65) Recipe in Marathi

प्रेषक Sindhu Sriram  |  22nd Feb 2016  |  
4 from 1 review Rate It!
 • Photo of Cauliflower 65 (Gobi 65) by Sindhu Sriram at BetterButter
कॉलिफ्लॉवर 65 (कोबी 65)by Sindhu Sriram
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1909

1

कॉलिफ्लॉवर 65 (कोबी 65) recipe

कॉलिफ्लॉवर 65 (कोबी 65) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cauliflower 65 (Gobi 65) Recipe in Marathi )

 • कॉलिफ्लॉवर - 1 मध्यम आकाराचा फ्लॉवर
 • घट्ट दही - 1/4 कप
 • काश्मिरी लाल तिखट - 4 लहान चमचे
 • बडीशेप - अर्धा लहान चमचा
 • आले लसणाची पेस्ट अर्धा लहान चमचा
 • मीठ - स्वादानुसार
 • तांदळाचे पीठ - 3 मोठे चमचे
 • गरम मसाला - 1 लहान चमचा
 • तेल - तळण्यासाठी

कॉलिफ्लॉवर 65 (कोबी 65) | How to make Cauliflower 65 (Gobi 65) Recipe in Marathi

 1. कॉलिफ्लॉवर धुवा आणि साफ करा, त्याची मध्यम आकाराची फुले कापा.
 2. फ्लॉवरच्या फुलांना 2 मिनिटे हलके शिजवा आणि गाळून घ्या. स्वयंपाकघरातील कापडावर घालून पूर्णपणे कोरडे करा. एका कढईत तेल गरम करा.
 3. दही, आले-लसणाची पेस्ट, मीठ, लाल तिखट, बडीशेप एकत्र करा. फुले तळायच्या ठीक अगोदर ही कृती करा. अन्यथा, अगोदरपासून एकत्र करून ठेवले तर ते फुलांना नीट लागत नाही.
 4. फुलांमध्ये सर्व दही मिसळा. एकसमान मिसळा, ज्यामुळे मिश्रण सर्व फुलांना एकसारखे लागेल. आता या मिश्रणावर तांदळाचे पीठ शिंपडा आणि सर्व फुलांना मिश्रण एकसमान मिश्रण लागल्याची खात्री करून घ्या.
 5. कुरकुरीत होईपर्यंत तळा.

My Tip:

हीच गोष्ट चिकनसाठी देखील केली जाऊ शकते. हाडेरहित चिकनचे तुकडे देखील वापरले जाऊ शकतात.

Reviews for Cauliflower 65 (Gobi 65) Recipe in Marathi (1)

Priyanka Pendurkara year ago

छानच रेसिपी...
Reply

Cooked it ? Share your Photo