मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला ड्रमस्टिक

Photo of Masala Drumstick by pranali deshmukh at BetterButter
1071
9
0.0(0)
0

मसाला ड्रमस्टिक

Feb-05-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला ड्रमस्टिक कृती बद्दल

शेवग्याच्या शेंगा खूप पौष्टिक असतात .यामध्ये मिनरल्स ,व्हिटॅमिन आहे शिवाय मधुमेह आणि अस्थमा अशा आजारांपासून दूर ठेवतात .यामध्ये कॅल्शिअम आणि आयर्न आहे त्यामुळे हाड बळकट होतात .तसेंच बी कॉम्प्लेक्स असल्यासमुळे पचन सुधारते .शिवाय गर्भवती स्त्रियांना प्रसूती नंतरच्या काळात गर्भाशयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 पाव शेवग्याच्या शेंगा
  2. 25 gr..सुके खोबरे
  3. 1 कांदा
  4. 1 चमचा खसखस
  5. धने पूड 2 tbsp
  6. लसूण 10-12पाकळ्या
  7. 1/2 इंच आले
  8. 1 tbsp.जिरे
  9. दालचिनी 1/2 इंच
  10. तमालपत्र 2
  11. बडी इलायची 1
  12. मिरे 2
  13. दगडफूल 1 tbsp
  14. तिखट 2 tbsp
  15. हळद 1 tbsp
  16. मीठ

सूचना

  1. शेंगा धुवून घ्या
  2. अशाप्रकारे वरील साल हातानी काढून घ्या.
  3. पाण्यात उकळायला ठेवा ,70- 80 शिजवायच्या आहे.
  4. खोबरं ,कांदा ,खसखस ,धणेपूड सर्व तेलात भाजलेलं आहे ते मिक्सरमधून वाटून घ्या.लसूण जिरे अद्रक वेगळी पेस्ट करा.तमालपत्र ,दालचिनी ,मिरे,दगडफूल वेगळी पेस्ट करा.
  5. बॉईल शेंगा झरुन घ्या.
  6. कढईत तेल टाका ,मोहरी तडतडली कि अद्रक लसूण ,जिरे पेस्ट नंतर कांदा धने पेस्ट ,तिला थोडं परतवल कि खोबरे खसखस वाटण ,शेवटी खडा मसाला टाकून परतवा.
  7. आता तिखट हळद मीठ घाला मिक्स करा
  8. बॉईल शेंगा घालून मिक्स करा.
  9. 2 वाटी पाणी घाला 5 मिनिट.झाकण ठेवून शिजू द्या.
  10. पोळी चपातीबरोबर सर्व्ह करा .ह्या शेंगा ओरपायला खूप मजा येते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर