मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर हैद्राबादी

Photo of Paneer Haidrabadi by pranali deshmukh at BetterButter
442
11
0.0(0)
0

पनीर हैद्राबादी

Feb-05-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर हैद्राबादी कृती बद्दल

पनीर हैद्राबादी हे मी एका रेस्टोरेंटमध्ये टेस्ट केलं .चव इतकी लाजवाब होती कि घरी एकदा करून बघावं अशी इच्छा झाली .मग तिथल्या वेटरला रेसिपी विचारली .विश्वास ठेवा अगदी तसच परफेक्ट घरी बनवलं तीच चव तोच रंग " लाजवाब " त्यादिवशी मुलाला आणि अहोला म्हटलं आज भाजी पार्सल आणली .दोघांनाही ती भाजी अगदी रेस्टोरेंट मधून आल्यासारखी वाटली .मला नावही विचारलं मी जेवण आटोपल्यावर विचारलं भाजी कशी होती ? उत्तर आलं घरची भाजी आणि बाहेरची ....शेवटी हॉटेलच्या भाजीची चव घरी बनवलेल्या भाजीला नाही येत .पण असं रोज रोज बाहेरून आणणे योग्य नाही .इतकं भाषण झाल्यावर मी उत्तर दिल ....भाजी घरीच बनवली " पनीर हैद्राबादी " इतकी टेस्टी झाली ना ! तुम्ही करून बघा अशा प्रकारे आणि सांगा मला हॉटेलसारखी चव येते कि नाही लाजवाब....

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • नॉर्थ इंडियन
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पनीर 200 gr.
  2. पालक 1/2 पाव
  3. 1 कांदा कापलेला
  4. 1 टोमॅटो कापलेला
  5. 1 तेजपान
  6. 1 इंच दालचिनी
  7. 1 बडी इलायची
  8. 1 वाटी कोथिंबीर चिरून
  9. 1 वाटी फ्रेश क्रीम
  10. 2 हिरव्या मिरच्या चिरून
  11. तिखट 2 tbsp
  12. 1/2 tbsp हळद
  13. मीठ
  14. गरम मसाला 1 tbsp
  15. तेल 2 डाव

सूचना

  1. साहित्य जमवून घ्या.पालकाची पाने तोडून धुवून घ्या.
  2. कढईत तेल टाका .कांदा,टोमॅटो हिरवी मिरची परतावा
  3. पालक टाका
  4. कोथिंबीर टाका फक्त एक ते दोन मिनिट चमच्याने हलवत राहा .शिजायला नको.
  5. सर्व भाज्या काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या
  6. कढईत तेल टाका ,तेल गरम झालं कि दालचिनी ,तेजपान ,बडी इलायची टाका त्याचा रंग बदलला कि बाहेर काढून घ्या.
  7. तेलात मिक्सरमधून काढलेलं वाटण टाका.
  8. तेलात छान मिक्स करा तेल सुटायला आलं कि फ्रेश क्रीम घाला.
  9. चसमच्यानी सारखे फिरवत एकजीव करा.
  10. पूर्णपणे मिक्स झाल्यावर तिखट ,हळद,गरम मसाला आणि मीठ घाला .तेल सुटेपर्यंत ढवळत राहा .रंग बदलायला लागेल.
  11. पनीरचे मोठे मोठे चकोनी काप टाका ,मिक्स करा .पाचमिनिट झाकण ठेवून होऊ द्या.
  12. पोळी ,पराठा, तंदुरी ,नान,भात कशाबरोबरही सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर