मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्या पपईची कोफ्ता करी

Photo of Kachya papichi kofta curry by pranali deshmukh at BetterButter
894
6
0.0(0)
0

कच्या पपईची कोफ्ता करी

Feb-06-2018
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्या पपईची कोफ्ता करी कृती बद्दल

पपई किती बहुगुणी आहे ते वेगळं सांगायला नको .मग स्किन संबंधी असो किंवा पोटाच्या विकारासंबंधी पपई खूप गुणकारी आहे .याच कच्या पपईचे कोफ्ते खूप छान बनतात .घरगुती पदार्थ असला तरी हॉटेलच्या रेसिपीला मागे टाकेल इतकी छान चव आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी पपईचा किस
  2. 4 चमचे बेसन
  3. 1 कांद्याची पेस्ट
  4. 2 टोमॅटोची प्युरी
  5. अद्रक लसूण जिरे पेस्ट 2 tbsp
  6. 4 काजू आणि 4-6 मगच पेस्ट
  7. 1कप दही घट्ट बांधलेले
  8. तिखट 2 चमचे
  9. हळद 1 tbsp
  10. मीठ
  11. तेल तळण्यासाठी
  12. तेल 2 डाव
  13. साखर 1 tbsp
  14. गरम मसाला 1 tbsp

सूचना

  1. पपईला मधातून चिरा .बियाअसतील तर काढून घ्या आतील भाग चाकूने थोडा साफ करा.
  2. वरील हिरवा भाग सोलून किसून घ्या.
  3. किसामध्ये बेसन. तिखट 1 tbsp .. हळद￰ ,गरम मसाला मीठ बारीक कोथिंबीर घाला आणि छान मळून घ्या .सहसा पाणी लागत नाही .
  4. तेलात छोटे छोटे बॉल बनवून तळून घ्या.
  5. टोमॅटो प्युरीसाठी बॉईल करा.
  6. कढईत तेल टाका .अद्रक लसूण पेस्ट परतवा.कांदापेस्ट टाका , काजू मगज पेस्ट ,घाला मिक्स करा .टोमॅटोप्युरी घाला .तेल सुटेपर्यंत चमचा हलवत राहा. थोडं पाणी घाला.
  7. तिखट ,हळद ,मीठ ,गरम मसाला घाला मिक्स करा आणि दही ऍड करा.
  8. हाय फ्लेमवर सारखे ढवळत राहा .नाहीतर दही फाटत .साखर घाला .3 मिनिटांनी रंग बदलेल ,कोफ्ते टाका आणि झाकण ठेवून गॅस बंद करा.
  9. मस्त पोळी ,पराठ्याबरोबर दहा मिनिटांनी सर्व्ह करा . तोपर्यंत मसाल्यातील फ्लेवर कोफ्त्यामध्ये येईल.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर