मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या हिरव्या दाण्याचे कढीगोळे

Photo of Turichya hirvya danyache kadhigole by pranali deshmukh at BetterButter
1995
4
0.0(0)
0

तुरीच्या हिरव्या दाण्याचे कढीगोळे

Feb-07-2018
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या हिरव्या दाण्याचे कढीगोळे कृती बद्दल

कढीगोळे नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं .अगदी पंचपक्वानाचे ताट समोर असले तरी मन कढीगोळ्यातच जात .असा हा पारंपरिक पदार्थ चवीला आंबट ,तिखट अप्रतिम लागतो .त्यातही तुरीच्या ओल्या दाण्याचे कढीगोळे म्हटले तर भन्नाट होतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटीभर तुरीचे दाणे ( सोले )
  2. 1 vati दही / ताक 1/2 लिटर
  3. बेसन 3 tbsp
  4. पाणी 1 लिटर
  5. 2 tbsp.अद्रकलसूण पेस्ट
  6. मोहरी 1/2 tbsp
  7. कढीपत्ता 10-12 पान
  8. हिंग 1/2 tbsp
  9. मेथी दाणे 5-6
  10. हिरव्या मिरच्या 5-6
  11. तिखट 2 tbsp
  12. हळद 1 tbsp
  13. लसूण पाकळ्या 3-4
  14. कोथिंबीर 1/4 वाटी
  15. जिरे 1 tbsp
  16. मीठ
  17. तेल 1 डाव

सूचना

  1. तुरीच्या शेंगा 1/2 कि.
  2. 1 वाटीभर सोले निघतात 1/2 kg.शेंगांचे
  3. दाणे धुवून घ्या .मिक्सरच्या पॉटमध्ये दाणे +लसूण +कोथिंबीर+जिरे+मीठ+ हिरव्या मिरच्या +1 tbsp तिखट सर्व वाटून घ्या.
  4. वाटणाचे गोल ,लांबोळे गोळे करा .
  5. दह्यामध्ये तिखट ,हळद मीठ आणि बेसन घालून रवीने मिक्स करा गुठळ्या व्हायला नको. दही पूर्णपणे मिक्स झाले कि 1 लिटर पाणी घाला.
  6. कढीसाठी सॉस पॅन वापरावे कारण उकळीने बाहेर जायची शक्यता असते.पॅनमध्ये तेल टाका ,मोहरी टाका मोहरी फुटली मेथी दाणे टाका, कढीपत्ता टाका ,लसूण अद्रक पेस्ट घाला थोडी परतवले कि हिंग ,हिरव्या मिरच्या घालून मिक्स करा.
  7. फोडणीत बनवलेलं दही बेसनाचं पातळ सारण टाका.
  8. कढिला मंद आचेवर उकळू द्या .गॅस फुल केला तर उतू जाते .दुसऱ्या उकळीला गोळे सोडा .
  9. सर्व गोळे सोडून झाले कि दहा ते 15 मिनिटांनी गोळे वर तरंगतील .तरांगले कि समजायचं गोळे शिजले .झाकण ठेवून पाच मिनिट आणखी शिजू द्या.
  10. कढीगोळे रेडी मस्त भाकरीबरोबर सर्व्ह करा.कारण कढीगोळ्याची खरी मजा भाकरीबरोबरच येते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर