मुख्यपृष्ठ / पाककृती / आलूकोफ्ता करी

Photo of Aloo kofta curry by Lakshmi Deshpande at BetterButter
852
3
0.0(0)
0

आलूकोफ्ता करी

Feb-07-2018
Lakshmi Deshpande
60 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलूकोफ्ता करी कृती बद्दल

पाककृती मी स्वतः बनवलेली आहे

रेसपी टैग

  • गुजरात

साहित्य सर्विंग: 5

  1. 5-7 बटाटे मध्यम आकाराचे उकडून कुस्करून
  2. 1 वाटी बेसन
  3. 2 कांदे पेस्ट करून
  4. 1 टोमॅटो प्युरी
  5. लसूण- अद्रक पेस्ट
  6. 1 चमचा जिरे
  7. 1 चमचा जिरे पूड
  8. 1 चमचा धने पावडर
  9. 2 चमचे गरम मसाला
  10. 2-3 चमचे तिखट
  11. 1 चमचा हळद
  12. 1 चमचा सब्जी मसाला
  13. मीठ चवीनुसार
  14. तेल तळण्यासाठी
  15. सजावटीसाठी कोथींबीर
  16. पाणी

सूचना

  1. एका बाऊल मध्ये कुस्करलेले बटाटे घेऊन त्यात तिखट, मीठ, हळद, बेसन, जिरे पूड, धने पावडर, 1 चमचा गरम मसाला घालून चांगले एकजीव करून घ्यावे....
  2. कढईत तेल गरम करून वरिल मिश्रणाचे गोळे बनवून तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे.....
  3. दुसर्या कढईत तेल गरम करून त्यात जिरे, लसूण- अद्रक पेस्ट घालून परतून घ्यावे यातच कांद्याची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे..नंतर टोमॅटो प्युरी घालून हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, सब्जी मसाला, घालून तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यावे.
  4. तेल सुटले कि मग त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगली ऊकळी येउ द्यावी...गॅस बारीक करून 10 मी करी शिजवून घ्यावी.
  5. मग करीमध्ये आलूकोफ्ते घालून परत 5मी मंद आचेवर शिजवून घ्यावे....
  6. गॅस बंद करून कोथिंबीर घालून गरम गरमच आलू कोफ्ता करी पोळी, पराठे,किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर