चमचमीत दम आलू | Dum Aloo Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  8th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dum Aloo recipe in Marathi,चमचमीत दम आलू, Archana Lokhande
चमचमीत दम आलूby Archana Lokhande
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  51

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

1 vote
चमचमीत दम आलू recipe

चमचमीत दम आलू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dum Aloo Recipe in Marathi )

 • लहान बटाटे १०-१२ (बेबी बटाटे)
 • दही १/२ कप
 • सुंठ १"
 • धने पावडर १ चमचा
 • गरम मसाला १/२ चमचा
 • लाल तिखट २ चमचे
 • हिंग १/२ चमचा
 • मीठ
 • तेल
 • पाणी

चमचमीत दम आलू | How to make Dum Aloo Recipe in Marathi

 1. एका बाऊलमध्ये दही छान फेटून त्यात किसलेले सुंठ १/२,धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स बाजूला ठेवले.(सुंठ, धनेपुड,गरम मसाला आणि तिखट हे सर्व फक्त अर्धे दह्यात घातले)
 2. एका वाटीत हिंगमध्ये पाणी घालून मिक्स करून ठेवले.
 3. बटाटे धुवून कुकर मध्ये मंद आचेवर ठेवून दोन शिट्ट्या घ्या
 4. बटाटे सोलून त्याला छोटे छिद्र पाडून घेतले.
 5. नंतर तेलात तळून घेतले.
 6. आता एका पँनमध्ये तेल घालून त्यात दह्याचे मिश्रण घालून तेल सुटेपर्यंत परतले.
 7. नंतर उरलेले मसाले घालून मिक्स करून हिंगाचे पाणी घालून मिक्स केले.
 8. पुन्हा अर्धा कप पाणी घालून तळलेले बटाटे घालून झाकण ठेवून ८-१० मिनिटे शिजवून घेतले.
 9. भाजी तेल सोडू लागेल तेव्हा पँन एका गरम तव्यावर ठेवून ८-१० मिनिटे 'दम' करून घेतले.
 10. तयार दम आलू भात, पोळी सोबत सर्व्ह करा.

My Tip:

यासाठी मोहरीचे तेल वापरले तर उत्तमच. चव खुप छान येते.

Reviews for Dum Aloo Recipe in Marathi (0)