मुख्यपृष्ठ / पाककृती / कोल्हापूरी तांबडा रस्सा

Photo of Kolhapuri Tambada  Rassa by Archana Lokhande at BetterButter
1016
8
0.0(0)
0

कोल्हापूरी तांबडा रस्सा

Feb-08-2018
Archana Lokhande
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोल्हापूरी तांबडा रस्सा कृती बद्दल

कोल्हापूरी तांबडा रस्सा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा किलो मटण
  2. आल-लसूण पेस्ट २ चमचे
  3. दही १/२ कप
  4. कोथिंबिर
  5. तेल
  6. कांदा ३
  7. ३ लवंग,३ काळी मिरी, चक्रीफुल, दालचिनी, तमालपत्र
  8. कोल्हापूरी मसाला २ चमचे
  9. हळद
  10. मीठ
  11. खोबरे
  12. पाणी

सूचना

  1. तवा गरम करून सर्व खडा मसाला भाजून त्याची पावडर करून घेतली.
  2. मटण स्वच्छ धुवून त्या आल-लसूण पेस्ट, दही,१/४ चमचा वाटलेला गरम मसाला, थोडी कोथिंबिर आणि मीठ घालून मिक्स करून ३० मिनिटे मुरत ठेवले.
  3. कुकरमध्ये गरम तेलात एक कांदा बारीक चिरलेला घालून परतून घेतला. त्यातच वाटलेला गरम मसाला चिमूटभर, कोल्हापूरी मसाला, हळद घालून परतावे.
  4. नंतर मँरिनेट केलेले मटण परतून लागेल तेवढे पाणी घालून कुकरच्या ४ शिट्ट्या घेतल्या.
  5. कुकर थंड होईपर्यंत तेलावर दोन कांदे आणि खोबरे भाजून वाटून वाटण करून घेतले.
  6. दुसऱ्या भांड्यात शिजलेले मटण घेऊन आवश्यक असल्यास पाणी घालून एक उकळी आणाली व मटणाचे पिस बाजूला काढून घेतले.
  7. नंतर त्यात वाटलेले अर्धे वाटण,थोडी कोथिंबिर घालून एक उकळी घेऊन गँस बंद केला.
  8. आपला तांबडा रस्सा झाला आता तेलात उरलेले वाटण,कोल्हापूरी मसाला आणि मटणाचे पिस परतून सुके मटण तयार करून घ्या.
  9. तयार कोल्हापूरी तांबडा रस्सा आणि सुके मटण चपाती, भाकरी बरोबर आणि सोबत कांदा, लिंबू खायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर