मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स रस्सा भाजी (शेवग्याच्या शेंगा + पावटा + सुरण)

Photo of Mix Rassa Curry (Drumpstick + Lima Beans + Elephant foot) by Shreya Bandekar at BetterButter
1212
4
0.0(0)
0

मिक्स रस्सा भाजी (शेवग्याच्या शेंगा + पावटा + सुरण)

Feb-08-2018
Shreya Bandekar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स रस्सा भाजी (शेवग्याच्या शेंगा + पावटा + सुरण) कृती बद्दल

मिक्स रस्सा भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शेवग्याच्या शेंगा (४)
  2. पावटा (१/२ कप)
  3. सुरण (२०० गँम) - (बारीक चिरलेला)
  4. टोमँटो - १ (बारीक चिरलेला)
  5. ओले खोबरे (१/२ कप) - वाटपासाठी
  6. कांदा - १ - वाटपासाठी
  7. लसुण - (४ पाकळ्या) - वाटपासाठी
  8. हिंग - १ चमचा
  9. कढीपत्ता - (६ पाने)
  10. कोथिंबीर - (बारीक चिरलेली)
  11. हळद - १/४ चमचा
  12. गरम मसाला - २ चमचे
  13. लाल तिखट मसाला - १ चमचा
  14. मीठ - चवीपुरते
  15. कोकम - १ ( सुरण ची खाज काढण्याकरिता)
  16. तेल - फोडणीसाठी
  17. पाणी - आवश्यकतेनुसार

सूचना

  1. ओले खोबरे , कांदा, लसुण मंद आचेवर लालसर भाजून मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून वाटून घेणे.
  2. सुरण ला १० मिनिटे कोकम लावून ठेवणे.
  3. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, हिंग, कोथिंबीर टाकून फोडणी द्यावी.
  4. फोडणी तडतडली की त्यामध्ये हळद, गरम मसाला, लाल तिखट मसाला, टोमँटो घालून परतवावे.
  5. वाटलेले वाटप घालून ते एकजीव करावे.
  6. शेवग्याच्या शेंगा, सूरण, पावटा व आवश्यकतेनुसार पाणी घालुन ढवळावे.
  7. मंद आचेवर २० मिनिटे शिजवावे.
  8. २० मिनिटा नंतर चवीपुरते मीठ टाकून परत एक उकळी आणून गँस बंद करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर