Photo of Saoji Mutton by Aarti Nijapkar at BetterButter
1775
4
0.0(0)
0

सावजी मटण

Feb-08-2018
Aarti Nijapkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सावजी मटण कृती बद्दल

सावजी मटण हे नागपुरी रेसिपी आहे नागपूर म्हंटल तर झणझणीत आणि चमचमीत आज आपण सावजी मटण बनवत आहोत... तर आधी आपल्याला सावजी मसाला बनवून घ्यावा लागेल मग सावजी मटण. चला तर मग साहित्य व कृती बघुयात आणि झणझणीत सावजी मटण रस्सा चा आस्वाद घेऊ.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मटण ५०० ग्रॅम
  2. तेल १ लहान चमचा
  3. हळद चिमूटभर
  4. कांदे चिरलेले २ मोठे
  5. आलं १ १/२ इंच
  6. लसूण पाकळ्या ८ ते १०
  7. कोथिंबीर २ मोठे चमचे
  8. सावजी मसाल्याचे साहित्य
  9. धने ४ मोठे चमचे
  10. जिरे २ मोठा चमचा
  11. लाल सुक्या मिरच्या। ५ ते ६
  12. दालचिनी १ इंच कांडी
  13. तेजपान 2 मोठे
  14. लवंग ५ ते ६
  15. काळीमिरी १२ ते १५
  16. हिरवी वेलची ३
  17. ज्वारीचं पीठ २ मोठे चमचे
  18. फोडणीसाठी
  19. तेल
  20. मीठ स्वादानुसार
  21. लाल तिखट १ मोठा चमचा
  22. पाणी

सूचना

  1. सर्व प्रथम मटण स्वच्छ धुवून घ्या कुकर मध्ये घालून त्यात थोड पाणी तेल व हळद घालून २ ते ३ शिटी करून घ्या.
  2. आता सावजी मसाला बनवून घ्या त्यासाठी लाल सुख्या मिरच्या , धने , जिरे , लवंग , काळीमिरी , तेजपान , दालचिनी ,हिरवी वेलची , सर्व खरपूस तव्यावर भाजून घ्या साधारण ५ मिनिटे मंद आचेवरच भाजा मग ज्वारीचं पीठ घालून एकत्र भाजून घ्या१ ते २ मिनिटे मग ताटात काढा व गार करून घ्या.
  3. आता कांदे लांब पातळ कापून घ्या, लसूण व आलं एकत्र तव्यावर तेल घालून भाजून घ्या लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  4. भाजलेले कांदे लसूण आलं एक ताटात काढून गार करा
  5. आता भाजलेले दोन्ही मसाले मिक्सर मधून वाटून घ्या. थोडं पाणी घालून मिश्रण अगदी बारीक करून घ्या
  6. आता वाटलेला मसाला गाळून घ्या किंवा मसलीन फडक्यात बांधून घट्ट पिळून घ्या सावजी मसाला तयार आहे
  7. आता कढईत तेल तापवून घ्या त्यात सावजी मसाला घालून ६ ते ७ मिनिटे परतवून घ्या.
  8. शिजवलेले मटण घालून एकत्र करून घ्या
  9. मग लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून झाकण ठेवा ५ ते ६ मिनिटे तोपर्यंत मसाला आणि मटण एकजीव होईल
  10. रस्सा हवा तसा करा पातळ किंवा थोडा घट्ट
  11. आता गरमागरम सावजी मटण तयार आहे
  12. सावजी मटण भाकरी,चपाती भातासोबत खाऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर