Photo of chicken Curry by Shreya Bandekar at BetterButter
1805
6
0.0(0)
0

chicken Curry

Feb-08-2018
Shreya Bandekar
35 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोंबडी - १/२ किलो
  2. कांदा - १ बारीक चिरलेला (फोडणीसाठी)
  3. सुके खोबरे - १/२ कप (वाटपासाठी)
  4. ओले खोबरे - १/४ कप (वाटपासाठी)
  5. कांदे - ३ चिरलेले ( वाटपासाठी)
  6. लसुण - ६ पाकळ्या (वाटपासाठी)
  7. आलं लसुण पेस्ट ( २ चमचे)
  8. हळद (१/२ चमचा)
  9. गरम मसाला ( ३ चमचे)
  10. लाल तिखट मसाला ( ३ चमचे)
  11. मीठ (चवीपुरते)
  12. तेल (फोडणीसाठी)
  13. पाणी ( आवश्यकतेनुसार)

सूचना

  1. कोंबडीच्या फोडी स्वच्छ धुवून साफ करून नंतर बारीक कापावे.
  2. लसुण, सुके खोबरे व ओले खोबरे लालसर भाजून घेणे व बाजूला काढणे.
  3. कांदा लालसर भाजला की त्यामध्ये थोडे तेल टाकून कांदा थोडावेळ भाजून घेणे.
  4. लसुण व खोबरे पाणी न घालता वाटूण घेणे. तसेच कांदा ही पाणी न घालता वाटूण घेणे.
  5. कापलेल्या फोडींना आलं लसुण पेस्ट, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, वाटलेले वाटप मिक्स करून १० मििनटे झाकुण ठेवावे.
  6. कढईमध्ये तेल गरम करून कांद्याची फोडणी द्यावी.
  7. कांदा लालसर झाला की त्यामध्ये कोंबडीच्या फोडी टाका व आवश्यकतेनुसास पाणी घाला.
  8. २० मििनटे झाकण ठेवुन कोंबडी रस्सा शिजू द्या.
  9. शिजल्यावर चवीपुरते मीठ टाकून १० मिनिटे परत शिजू द्या व नंतर गँस बंद करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर