दम आलू | Dum aloo Recipe in Marathi

प्रेषक Ajinkya Shende  |  9th Feb 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Dum aloo by Ajinkya Shende at BetterButter
दम आलूby Ajinkya Shende
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

2

3 votes
दम आलू recipe

दम आलू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dum aloo Recipe in Marathi )

 • अर्धवट उकडुन घेतलेले छोटे बटाटे २०० ग्रॅम
 • दही २५० ग्रॅम
 • खडा मसाला(जीरं, २-३ लवंग,२-३ काळी मीरी,२ हिरव्या वेलची,दालचीनी एक छोटा तुकडा,तेजपत्ता १-२)
 • आलं-लसुण पेस्ट
 • लाल मिर्ची पावडर
 • हळद
 • गरम मसाला
 • घणा-जीरा पावडर
 • किचन किंग मसाला
 • कसूरी मेथी
 • ३ मोठे कांदे बारीक चिरलेले
 • २ लहान टोमॅटो बारीक चिरलेले
 • तेल
 • बटर
 • मीठ
 • कोथिम्बीर
 • गार्निशिंग साठी थोडं पनीर

दम आलू | How to make Dum aloo Recipe in Marathi

 1. प्रथम उकडलेल्या बटाट्यांची साल काढून टूथपिक किंवा काटाचमच्याने थोडे होल पाडून घ्यावेत.
 2. नंतर एका बाऊल मधे दही घेऊन त्यात अर्धा चमचा आलं लसुण पेस्ट,अर्धा चमचा लाल मिर्ची पावडर,अर्धा चमचा गरम मसाला,अर्धा चमचा धणा-जीरा पावडर,पाव चमचा किचन किंग मसाला,पाव चमचा हळद,मीठ आणि थोडी कसूरी मेथी टाकून हयात बटाटे १०-१५ मिनिट मैरीनेट करुन करुन घ्यावे.
 3. बटाटे मॅरिनेट होईपर्यंत पॅन मधे ३-४ चमचे तेल घेवून तेल तापल्यावर त्यात सर्व खडा मसाला अर्धा मिनिट परतवुन घ्यावा.
 4. नंतर हयात बारीक कापलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवुन घ्यावा.
 5. नंतर हयात एक चमचा आलं-लसुण पेस्ट थोडी परतवुन नंतर हयात टोमॅटो टाकून टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत परतवुन घ्यावे.
 6. हे मिश्रण थंड होईपर्यंत मॅरीनेटेड बटाटे तेलावर व्यवस्थित परतवुन घ्यावे.
 7. नंतर कांदा टोमॅटो मसाला व ८-१० भीजवलेले काजू हयांची मिक्सर मधे स्मूथ पेस्ट करुन घ्यावी.(पेस्ट करताना तेजपत्ता काढून ठेवावा)
 8. नंतर पॅन मधे ३-४ चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात कांदा-टोमॅटो प्यूरी टाकून ४-५ मिनिट मध्यम आचेवर परतवुन घ्यावी.
 9. नंतर हयात १ चमचा लाल मिर्ची पावडर,पाव चमचा हळद,अर्धा चमचा धणा-जीरा पावडर,पाव चमचा किचन किंग मसाला टाकून हे सर्व तेल सुटेपर्यंत परतवुन घ्यावे.
 10. नंतर हयात मॅरीनेशन साठी वापरलेलं उरलेलं दही, आवष्यकतेनुसार पाणी व चवीनुसार मीठ टाकून २ मिनिट पुन्हा परतवुन घ्यावे.
 11. नंतर हयात बटाटे टाकून वरून अर्धा चमचा गरम मसाला,बारीक चिरलेली कोथिम्बीर,थोडी कसूरी मेथी व २ चमचे बटर टाकून २ मिनिट झाकण ठेवून शिजवुन घ्यावे.
 12. भाजी सर्विंग बाऊल मधे काढून गार्निशिंग साठी वरून बारीक कापलेली कोथिम्बीर व थोडं पनीर कीसून टाकावं.

My Tip:

बटाट्यांना मॅरीनेशन करणं ऐच्छिक आहे. बटाटे तेलात डीप फ्राय ही करु शकता.

Reviews for Dum aloo Recipe in Marathi (2)

Swarada Shende2 years ago

Real taste.. bhariii..
Reply

Neha Santoshwar2 years ago

Wow superb
Reply