मुख्यपृष्ठ / पाककृती / मश्रुम टिक्का मसाला

Photo of Mashroom tikka masala by pranali deshmukh at BetterButter
781
5
0.0(0)
0

मश्रुम टिक्का मसाला

Feb-09-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मश्रुम टिक्का मसाला कृती बद्दल

मश्रूममध्ये￰ आयर्न आणि व्हिटॅमिन सी असते जे आपली हाडं आणि दात बळकट करतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 200 gr.मश्रुम
  2. 2 कांदे उभे चिरलेले
  3. 2 टोमॅटोची पेस्ट
  4. 4 लसूण पाकळ्या क्रश करून
  5. 1/2 इंच आलं किसून किंवा वाटून
  6. कसुरी मेथी 1 tbsp
  7. 1 लाल काश्मिरी मिरची
  8. तिखट 2 tbsp
  9. हळद 1/2 tbsp
  10. मीठ
  11. तेल 2 डाव
  12. बेसन 1 tbsp
  13. कॉर्नफ्लोर 2 tbsp
  14. दही 2 चमचे
  15. गरम मसाला 1 tbsp

सूचना

  1. मश्रुम छान धुवून घ्या .धुतांना नळाच्या धारीखाली धरा .कारण मश्रूममध्ये आधीच पाणी असत त्यामुळे जास्तवेळ पाण्यात ठेवू नये.
  2. कोरड्या कापडांनी पुसून कोरडी करा .मधातूनचाकूने कापून पाहिजे तेवढ्या जाडीच्या स्लाइस करा.
  3. एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोर ,दही ,गरम मसाला ,तिखट,मीठ ,एक चमचा तेल मिक्स करा त्यामध्ये मश्रुम घोळा.प्रत्येक फोडिला लागायला हवं.20-30 मिनिट फ्रिजमध्ये ठेवा.
  4. नॉनस्टिक तव्यावर शॉलोफ्राय करा.
  5. कढईत तेल टाका..मोहरी लसूण ,अद्रक परतवा . कांदे घाला गुलाबी होईपर्यंत सारखे चमच्याने हलवत राहा.
  6. हे टिक्का तसेही स्नॅक्स म्हणून सॅलडबरोबर खायला छान लागतात.
  7. टोमॅटो पेस्ट ऍड करा .तेल सुटेपर्यंत मिक्स छान परतवायची आहे.
  8. कस्तुरी मेथी हातानी चोळून टाका .तिखट ,हळद ,मीठ घाला .मिरची चिरून टाका.
  9. आता बनवलेले टिक्का ऍड करा .छानमसाल्यात मिक्स करा.
  10. एक वाटी पाणी घाला.पाण्याला उकळी आली कि बेसन एका वाटीत थोडं पाणी घालून मिक्स करा आणि उकळत्या ग्रेव्हीमध्ये टाका.
  11. झाकण ठेवा पाच मिनिट .मश्रुम शिजायला सात ते आठ मिनिट लागतात.
  12. मश्रुम टिक्का मसाला पण माझ्या स्टाईलने रेडी.चपाती ,पराठा ,फुलके सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर