Photo of Khaskhas Rassa Bhaji by Vaishali Joshi at BetterButter
3031
6
0.0(1)
0

Khaskhas Rassa Bhaji

Feb-10-2018
Vaishali Joshi
360 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप खसखस
  2. २ कांदा
  3. १० लसूण पाकळ्य़ा
  4. १ इंच आल्याचा (सोलून )तुकडा
  5. २ चमचे सुक्या खोब्र्या चा कीस
  6. २ लाल सुक्या मिरच्या
  7. १ चमचा धणे
  8. १/२ इंच कलमी
  9. १/२ चमचा शाही जीर
  10. १ तेज पान
  11. १ मोठी विलायची
  12. १ जाय पत्री
  13. १/२ चमचा कसूरी मेथी
  14. तेल
  15. तिखट
  16. हळद
  17. मीठ

सूचना

  1. खसखस ५-६ तास भिजत घालून ठेवा
  2. थोड्या थोडया तेलात कांदा ,शाही जीरे ,धणे ,लाल मिरच्या , तेज पान , मोठी विलायची ,जाय पत्री खोब्रा किस आणि कलमी छान लालसर भाजून घ्या
  3. हे सर्व भाजलेले साहित्य आणि आल , लसूण एकत्र करून मिक्सर मधे थोड पाणी टाकून अगदी बारीक़ वाटून बाजूला ठेवा
  4. भिजवलेली खसखस पाण्य़ातुन काढून घेउन ति पण पाणी टाकुन बारीक़ वाटून घ्या .
  5. कढईत १ कप तेल तापत ठेवा (ही भाजी थोड्या जास्ती तेलात केली जाते )
  6. तेल तापल्यावर १ बारीक़ चिरलेला कांदा घालून लालसर झाल्यावर वाटलेला मसाला घालून तेल सुटे स्तोवर परता
  7. १/२ चमचा कसूरी मेथी घाला परतून घ्या थोड पाणी घालून पुन्हा परता आणि तिखट ,हळद टाकुन बारीक़ केलेली खसखस घाला
  8. थोड़े पाणी घालून झाकण ठेवा ५ मिनिटे
  9. चवी पूरते मीठ टाका ,थोडा लिंबाचा रस टाकुन मिक्स करा २ मिनिटे शिजू द्या
  10. मस्त तेलाचा तवंग येइल
  11. खाली उतरवून सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून वर कोथींबीर टाकुन, तेल लावून ( घडिची पोळी )केलेल्या पोळी सोबत वाढा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Feb-10-2018
Mamta Joshi   Feb-10-2018

अप्रतिम . . हे कलमी काय असतं ?

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर