मुख्यपृष्ठ / पाककृती / छोले भटुरे - एक पारंपारिक भारतीय स्ट्रीट फूड

Photo of Chola Bhatura - A typical Indian Street Food by Kriti Singhal at BetterButter
4377
131
4.7(0)
0

छोले भटुरे - एक पारंपारिक भारतीय स्ट्रीट फूड

Feb-25-2016
Kriti Singhal
300 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. भटुरे (काहीसे आरोग्यदायी) बनविण्यासाठी :
  2. 1 वाटी रवा
  3. 1 वाटी मैदा
  4. अर्धी वाटी गव्हाचे पीठ
  5. 1 लहान चमचा बेकिंग पावडर
  6. अर्धा लहान चमचा मीठ
  7. अर्धा लहान चमचा साखर
  8. 1 वाटी आंबट दही
  9. 1 कप कोमट पाणी
  10. तळण्यासाठी तेल
  11. छोले बनविण्यासाठी :
  12. छोले 2 वाट्या (8 तास भिजवलेले)
  13. खडे मसाले:
  14. 4 तमालपत्र
  15. 2 काळे वेलदोडे
  16. 6 लवंगा
  17. 1 दालचिनीची काडी
  18. 6 काळे मिरे
  19. रोजचे मसाले :
  20. 2 मोठे चमचे गरम मसाला
  21. 1 लहान चमचा काश्मिरी मिरची
  22. अर्धा लहान चमचा हळद
  23. मीठ रुचिनुसार
  24. कांदे - 2 मध्यम
  25. आले - ताजे किसलेले
  26. लसूण - 5 पाकळ्या
  27. टोमॅटो - 1 मोठा

सूचना

  1. भटुरे बनविण्यासाठी
  2. सर्व कोरडे पदार्थ एकत्र करून 2-3 वेळेस चाळून घ्या आणि मऊ कणिक मळून घ्या.
  3. नंतर 4 तासांसाठी त्याला उबदार जागी ठेवा. कणिक आंबल्यानंतर दुप्पट आकाराचे होईल. आता त्याचे 12 गोळे करून त्यांना लाटा आणि तळा.
  4. छोले बनविण्यासाठी.
  5. भिजवलेले छोले, खडे मसाले आणि मीठ घालून 5-6 शिट्या होईपर्यंत प्रेशर कुकरमध्ये शिजवा. कांदा, टोमॅटो, लसूण, आले वाटून बारीक पेस्ट करा. आता एका पॅनमध्ये तेल घ्या.
  6. कांद्याच्या मिश्रणाला जवळजवळ 5 मिनिटे तळा. पॅनच्या तळाशी मसाला लागू नये म्हणून त्यात कमी प्रमाणात पाणी घालत रहा.
  7. त्यात काश्मिरी मिरची, गरम मसाला आणि हळद घाला. थोडे तेल घालून तेल सुटेपर्यंत तळा. तळताना पाणी घालत रहा.
  8. आता, तेल सुटले की त्यात शिजवलेले छोले घाला. 5 मिनिटे परता. रश्यात पुरेसे पाणी घालून झाकण लावा. मीठ घालून मंद आचेवर किमान 10 मिनिटांसाठी उकळू द्या.
  9. आवश्यक असेल तर, तुम्ही पुन्हा प्रेशर कुकरमध्ये 10 मिनिटांसाठी उकळायला ठेवू शकता, तेव्हा वर थोडा गरम मसाला शिंपडा.
  10. आणि त्या नंतर एक किंवा दोन शिट्या होऊ द्या. छोले तयार आहेत. त्यावर ताजी कोथिंबीर पसरा!
  11. कुरकुरीत भटुरे, कांद्याचे काप आणि फळांच्या सलाडबरोबर गरमगरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर