मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टीम कचोरी कढी

Photo of Steam kachori kadhi by Rohini Rathi at BetterButter
815
5
0.0(0)
0

स्टीम कचोरी कढी

Feb-11-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टीम कचोरी कढी कृती बद्दल

Kadhi मध्ये आपण भजे किंवा कोफ्ते घालून बनवतो पण कचोरी बनवून व वाफवून बनवलेली ही कढी सोपी व स्वादिष्ट लागते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कचोरीसाठी
  2. गव्हाचे पिठ अर्धा कप
  3. मैदा अर्धाकफ
  4. बेसन पीठ 3 टेबल स्पून
  5. तेल एक टेबल स्पून
  6. सोडा अर्धा टीस्पून
  7. मीठ चवीनुसार
  8. कचोरी च्या आतील सारणासाठी
  9. किसलेले खोबरे अर्धा वाटी
  10. बारीक चिरलेली हिरवी मिरची तीन ते चार
  11. तेल अर्धा टीस्पून
  12. हिंग
  13. मोहरी अर्धा टीस्पू
  14. मीठ चवीनुसार
  15. कढी बनवण्यासाठी
  16. दही एक कप
  17. बेसन चार टेबलस्पून
  18. तेल एक टेबल स्पून
  19. जिरे अर्धा टीस्पून
  20. बारीक चिरलेली हिरवी मिरची तीन ते चार
  21. मीठ चवीनुसार
  22. पाणी अर्धा कप
  23. कस्तुरी मेथी अर्धा टीस्पून

सूचना

  1. सर्वप्रथम कचोरी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ मैदा बेसन पीठ तेल सोडा घालून मिश्रण एकजीव करून मध्यम पीठ मळून घ्यावे
  2. दहा मिनिटे पीठ तसेच झाकून ठेवावे
  3. कचोरी आतील सारण बनवण्यासाठी तेल गरम करून त्यात जिरे ची फोडणी घालून हिरवी मिरची घालून किसलेले खोबरे परतून घ्यावे
  4. नंतर चवीनुसार मीठ घालून मिश्रण एका ताटात काढून थंड करून घ्यावे
  5. तयार पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून हातावर पोळी लाटून कचोरी सारखे म्हणून त्यात वरील मिश्रण घालून कचोरी बनवून घ्यावी
  6. सर्व कचोऱ्या बनवून कढईत पाणी गरम करून कचोरी वाफवून घ्यावी
  7. कढी बनवण्यासाठी दह्यामध्ये बेसन घालून बेटर बनवून घ्यावे
  8. एका पातेल्यात तेल गरम करून जिरे ची फोडणी कसुरी मेथी बारीक चिरलेली हिरवी मिरची व हिंग घालून वरील दह्याचे मिश्रण घालून सतत ढवळत राहावे
  9. शेवटी चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यावी
  10. एका बाऊलमध्ये कडी काढून त्यात वाटलेली कचोरी घालून गरम गरम पोळी व भाताबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर