मुख्यपृष्ठ / पाककृती / मश्रुम मटार मकई

Photo of Mushroom Matar Makai by Renu Kulkarni at BetterButter
936
7
0.0(0)
0

मश्रुम मटार मकई

Feb-11-2018
Renu Kulkarni
50 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मश्रुम मटार मकई कृती बद्दल

मश्रुम व मका जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक अफलातून चव येते व चवदार रस्सा तयार होतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ताजे मश्रुम 200 ग्रॅम
  2. मटार दाणे 1 वाटी
  3. स्वीट कॉर्न दाणे 1 वाटी
  4. कांदा चिरून 2 वाटी
  5. चिरलेले टमाटे 3
  6. किसलेले आले 1 टीस्पून
  7. हिरवी मिरची चिरून 2 नग
  8. खसखस 2 टीस्पून
  9. तेल 3 टेबल स्पून
  10. धनेपूड 2 टीस्पून
  11. मेथी दाणे 12
  12. मोहरी 1/2 टीस्पून
  13. जीरे 1/2 टीस्पून
  14. हळद 1/2 टीस्पून
  15. तिखट 2 टीस्पून
  16. मीठ 2 टीस्पून

सूचना

  1. मश्रुम मिठाच्या पाण्यात भिजवून स्वच्छ करून घ्या.
  2. टमाटे मिक्सर मधून वाटून घ्या.
  3. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी व जीरे आणि मेथी दाणे घालून फोडणी करून घ्या.
  4. त्यात मिरच्या, व आलेकिस घाला.
  5. हळद व खसखस घालून परतून घ्यावेत.
  6. कांदा घालून खमंग परतून घ्यावे.
  7. तिखट व धनेपूड घालून परतून घ्या.
  8. मटार दाणे व मका दाणे घालून परतून घ्यावेत.
  9. टमाट्याचे वाटण घालून खमंग परतून घ्यावे.
  10. मश्रुम चे पातळ काप करून भाजीत घाला.
  11. मिश्रण नीट परतून पाच मिनिटे उकळा .
  12. गरमागरम चवदार भाजी वाढा.
  13. पोळी. ..भाकरी. ..भात कशासोबतही छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर