Photo of Masala Dosai by Nayana Palav at BetterButter
824
13
0.0(5)
0

Masala Dosai

Feb-12-2018
Nayana Palav
600 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Masala Dosai कृती बद्दल

मसाला डोसा हा दक्षिण भारतातील पारंपारिक पदार्थ आहे. मुख्यत: न्याहरी साठी हा पदार्थ केला जातो. हा डोसा तुलुवा मेंगलोर इथे जन्माला आला. उडिपी होटेल ने हया डोस्याची ओळख सगळयांना करून दिली. हा डोसा सर्व जगभरातील लोकांना आवडतो. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • कर्नाटक
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. उडीद डाळ १ कप
  2. अडीच कप तांदूळ
  3. चणा डाळ १/२ कप
  4. मेथीदाणे १/२ टीस्पून
  5. मीठ (आवश्यकतानुसार)
  6. बटाटे २ उकडलेले मोठे
  7. कांदा १ मध्यम
  8. उडीद डाळ १ टिस्पून
  9. हिरव्या मिरच्या २
  10. कढीपत्ता पाने ६
  11. तेल २ टीस्पून
  12. मोहरी १/४ टीस्पून
  13. जिरे १/४ टीस्पून
  14. हिंग १/४ टीस्पून
  15. हळद १/४ टीस्पून

सूचना

  1. उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे धुवून ६ तास पाण्यात भिजत ठेवावे.
  2. उडीद डाळी बरोबरच मेथी दाणे आणि चणा डाळ बाजूला भिजवावी.
  3. नंतर त्यातील पाणी काढून टाकून मिक्सरवर वेगवेगळे बारीक वाटून घ्यावे.
  4. वाटलेली डाळ आणि तांदूळ, मेथीदाणे एकत्र करावेत.
  5. मिश्रण अगदी अगदी पातळ करू नये.
  6. झाकण ठेवून १० तास मिश्रण आंबू द्यावे.
  7. मिश्रण आंबले कि नंतर त्यात चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे.
  8. डोसे बनवण्यासाठी आंबलेले पिठात किंचीत पाणी घालून पातळ करावे.
  9. बटाटे कुकरमध्ये २ शिट्टी करून उकडून घ्या.
  10. बटाटे बारीक चिरून घ्या.
  11. कांदा बारीक उभा चिरून घ्या.
  12. एका भांडयात २-३ चमचे तेल गरम करा.
  13. मोहरी, जिरे, हिंग, हळद, आले घालून फोडणी करावी.
  14. त्यात थोडी उडीद डाळ घालावी. मिरच्या बारीक चिरून घालाव्या. कढीपत्ता घालावा.
  15. मिरच्या बारीक चिरून घाला.
  16. कढीपत्ता घाला.
  17. मध्यम आचेवर कांदा परतावा. चिरलेला बटाटा घालून परतावे. चवीपुरते मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.
  18. चिरलेला बटाटा घालून परता.
  19. चवीपुरते मिठ घाला.
  20. कोथिंबीर घाला.
  21. नॉनस्टीक तव्यात डोसा वाटीने नीट पसरून घ्या.
  22. थोडा शिजला की बाजूने तेल सोडा.
  23. बटाटयाची भाजी घाला.
  24. डोस्याची गुंडाळी करा, चित्र बघा.
  25. डोसे गरमगरम सांबार आणि चटणीबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Feb-15-2018
Mahi Mohan kori   Feb-15-2018

Khup Chan

Jayant Kanse
Feb-14-2018
Jayant Kanse   Feb-14-2018

best

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर