मुख्यपृष्ठ / पाककृती / खमंग काकडी

Photo of Khamng kakdi by साची सचिन at BetterButter
582
4
0.0(0)
0

खमंग काकडी

Feb-13-2018
साची सचिन
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमंग काकडी कृती बद्दल

प्रत्येक सणाला नैवेद्याला आमच्या घरी ही बनावली जाते.नैवेदयासाठी कांदा लसून चालत नाही म्हणून खमंग काकडी केलि जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सॅलड

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव किलो काकडी
  2. २-३ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  3. २ चमचे शेंगदाणा कूट
  4. १ चमचा साखर
  5. २ चमचे लिम्बु रस
  6. कोथिंबीर
  7. चविनुसार मिठ
  8. फोडणीसाठी : १ चमचा तेल
  9. १/२ चमचा जीर

सूचना

  1. काकडी किसुन घ्यावी किंवा बारीक़ चिरून घ्यावी
  2. मग त्यात हिरवी मिरची, साखर, शेंगदाणा कूट, लिम्बु रस,मिठ घालुन सर्व चांगले मिक्स करावे
  3. मग फोडणीच्या भांडयात १ चमचा तेल घेऊन तेल तापले की त्यात जीर घालुन ककडीच्या मिश्रणाला फोडणी द्यावी
  4. कोथिंबीर घालुन पुन्हा सर्व मिक्स करावे आणि सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर