कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Masvadi and curry

Photo of Masvadi and curry by Trupti Raut at BetterButter
1558
5
5(1)
0

Masvadi and curry

Feb-13-2018
Trupti Raut
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • महाराष्ट्र
 • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

 1. बेसन पीठ दीड वाटी,पाणी एक ते सव्वा वाटी,मिरची लसूण पेस्ट
 2. एक मोठा कांदा चिरून,एक लसूण कांदा पूर्ण सोलून तेलात परतून घ्यायचं
 3. किसलेले खोबरे एक वाटी, एक चमचा खसखस ,3/4चमचे तीळ ,एक चमचा शेंगदाणस भाजून जाडसर वाटणे
 4. घरचा मसाला,हळद मीठ, जिरे, मोहरी ,तेल पाणी
 5. कोथिंबीर ,मटण किंवा चिकन मसाला एक चमचा

सूचना

 1. भाजलेल्या कांदा लसूण पैकी अर्धा कांदा घेऊन त्यात अर्धी वाटी खोबरे ,तीळ खसखस मीठ घरचा मसाला कोथिंबीर ऍड करून सारण बनवा
 2. कढई मध्ये तेल टाकून मिरची लसूण पेस्ट हळद मीठ आणि पाणी टाकून उकळी आणा मग त्यात पीठ टाकून गुठळक न करता चॅन एकजीव करा .झाकन ठेऊन वाफ काढा .
 3. ओला रुमाल पोळपाट वर ठेऊन त्यावर कोथिंबीर किसलेले खोबरे पसरवा.मगत्यावर तयार पिठाचा गोळा टाकून पाण्याचा हात लावून पसरवून घ्या .
 4. मग त्यावर सारण टाकून रोल बनवायचा आणि त्रिकोणी आकार देऊन दाबायचे व अलगद रुमाल काढायचा. झाली वडी तयार .मग तुकडे कट करायचे .
 5. आमटी साठी राहिलेले कांदा लसूण खोबरे कोथिंबीर घरचा मसाला मटण मसाला एक चमचा सर्व बारीक पेस्ट करायची .
 6. तेलात मसाला चांगला फ्राय करून गरजेनुसार पाणी मीठ टाकायचे .झाला झणझणीत रस्सा तयार ..
 7. गरम भाकरी सोबत मासवाडी रस्सा सर्व्ह करा .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Feb-17-2018
Poonam Nikam   Feb-17-2018

wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर