मुख्यपृष्ठ / पाककृती / अप्पे विद सांबर आणि चटनी

Photo of Appe with sambar and chutney by Mrudula Ghose at BetterButter
2181
3
0.0(0)
0

अप्पे विद सांबर आणि चटनी

Feb-13-2018
Mrudula Ghose
1080 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अप्पे विद सांबर आणि चटनी कृती बद्दल

दक्षिण ची पारंपारिक पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • तामिळ नाडू
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. १ कप तांदूळ
  2. १/२ कप मूगडाळ
  3. १/२ कप उडीद दाळ
  4. १/४ कप चणाडाळ
  5. १/४ कप तूर दाळ
  6. १/४कप पोहे
  7. १टिस्पुन मेथी
  8. सांबर.....१/२कप शिजवलेली तूरीची दाळ
  9. १कप मिक्स भाज्या( शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळा,
  10. तोंडळी, फूलकोबी, फ्रेंच बिंन्स, व आवडीनुसार)
  11. १/४कप चिंच पेस्ट
  12. २ टेबल स्पुन सांबर मसाला
  13. १ कांदा उभा चिरलेला
  14. १ टमाटर
  15. २/३लाल सुकी मिरची
  16. हळद, लाल मिरची पावडर, मिठ, लसूण
  17. मोहरी, जिर, करी पत्ता, कोथिंबीर
  18. चटनी.... ओल नारळ,लसुण, हिरव्या मिरच्या
  19. जिर, मिठ आणि दाळव, कोथिंबीर

सूचना

  1. तांदूळ आणि सर्व दाळे ५/६ तास भिजत ठेवा
  2. त्यात १० मिनिटे भिजवलेले पोहे आणि मेथीचे दाने टाकून बारीक वाटून घ्या व ७/८तास आंबवण्या साठी बाजूला ठेवा.
  3. सांबर..... एका पातेल्यात२/3 टेबल स्पून तेलात मोहरी, जिरे, लाल सूक्या मिरच्या, लसुण आणि करी पत्ता टाकून परता
  4. नंतर कांदा टाकून, थोड्या वेळाने २/३हिरव्या मिरच्या, अदरक लसूण पेस्ट टाकून कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत परता
  5. तोपर्यंत भाज्या २ मिनिटे माईक्रो मध्ये वाफवून घ्या
  6. आता टमाटर घालून थोड्या वेळ परतून, हळद, मिरची पावडर व शिजवून घेतली ली तूरीची दाळ घालून मिक्स करून, चिंच पेस्ट, सांबर मसाला, मिठ टाकून ऊकळी आणा.
  7. वाफवलेल्या भाज्या टाकून १०/१२ मिनिटे शिजवून घ्या व कोथिंबीर ने सजवा
  8. चटनी चे सर्व साहित्य वाटून घ्या
  9. एका कढल्यात तेल गरम करून फोडणी द्या.फोडणी मध्ये मोहरी, जिरे, लाल मिरची, ऊडीद दाळ, करी पत्ता टाकून ,हे चटनी वर ओता
  10. १ टेबल स्पून तेलात मोहरी, जिर, १बारीक चिरलेला कांदा, २/३बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, करी पत्ता टाकून थोड्या वेळ परतून १ टेबल स्पून अदरक लसूण पेस्ट टाकून ,ही फोड़णी अप्पे मिश्रणात टाकून एकजीव करा .
  11. चवीनुसार मिठ टाका.
  12. आता अप्पे पात्राला तेल लावून गरम करायला ठेवा
  13. १चम्मच मीश्रण टाकून , झाकून , एका बाजूने शिजवून घ्या
  14. एका बाजूने शिजल्यावर ,पलटून दुसर् या बाजूने पण शिजवा.
  15. अश्या प्रकारे सगळे अप्पे बनवून घ्या.
  16. व सांबर आणि चटणी बरोबर लगेच सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर