Photo of Chakali by Nayana Palav at BetterButter
763
19
0.0(4)
0

Chakali

Feb-13-2018
Nayana Palav
2880 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Chakali कृती बद्दल

चकली हा महाराष्ट्रातील पारंपारीक पदार्थ आहे. दिवाळीत चकली केली जाते. प्रवासात नेण्यासाठी चकली हा अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. अशी ही कुरकरीत चकली लहान थोर सगळयांना आवडते. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. तांदूळ २ कप
  2. चणाडाळ दिड कप
  3. उडीदडाळ १/२ कप
  4. जिरे ५० ग्राम
  5. धणे १/४ कप
  6. मूगडाळ १/२ कप
  7. साबुदाणा १/४ कप
  8. भाजणी १ कप
  9. पाणी १ कप
  10. हिंग १ टीस्पून
  11. पांढरे तीळ २ टीस्पून
  12. ओवा १/२ चमचा
  13. लाल तिखट १ टेबलस्पून
  14. लोणी १ टीस्पून
  15. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्व डाळी वेगवेगळया धुवून घ्याव्यात.
  2. सुती कपड्यावर सावलीत वाळत घालाव्यात.
  3. तांदूळ स्वच्छ धूवून वाळवावेत.
  4. सर्व डाळी तपकिरी रंग येईपर्यंत वेगवेगळ्या भाजून घ्या.
  5. तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे भाजून घ्या.
  6. जिरे, धणे भाजून घ्या.
  7. सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व इतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्या.
  8. थंड झाले कि बारीक दळून आणा.
  9. एका भांडयात १ कप पाणी उकळत ठेवा.
  10. त्यात १ टीस्पून लोणी टाका.
  11. त्यात हिंग, लाल तिखट, ओवा, पांढरे तीळ आणि मीठ घालून ढवळा.
  12. पाणी उकळले कि गॅस बंद करा.
  13. चकलीची भाजणी घाला.
  14. नीट मिक्स करा.
  15. १० मिनीटे झाकून ठेवा.
  16. कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळून घ्या.
  17. चकलीच्या साच्याला आतून तेलाचा हात लावा.
  18. म्हणजे पिठ चिकटणार नाही.
  19. साच्यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडा.
  20. अगोदर मोठया नंतर मध्यम आचेवर चकल्या तळून घ्या.
  21. तयार आहेत तुमच्या कुरकरीत चकल्या.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dhanashri Parulekar
Feb-18-2018
Dhanashri Parulekar   Feb-18-2018

Khup bhari

Mahi Mohan kori
Feb-15-2018
Mahi Mohan kori   Feb-15-2018

Kurmkarm masttch...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर