मुख्यपृष्ठ / पाककृती / कोलंबी भात / कोलंबीची खिचडी / कोलंबी पुलाव

Photo of Kolambi Bhat/ Prawns Pulav by Purva Sawant at BetterButter
1375
4
0.0(0)
0

कोलंबी भात / कोलंबीची खिचडी / कोलंबी पुलाव

Feb-15-2018
Purva Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोलंबी भात / कोलंबीची खिचडी / कोलंबी पुलाव कृती बद्दल

कोकणातील पारंपारिक, लोकप्रिय आणि अत्यंत रुचकर असा हा भात……

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. सोललेल्या कोलंब्या- १ कप
  2. बासमती तांदूळ (कोलम पण चालेल)- २ कप
  3. कांदा, उभा चिरून- २ मध्यम
  4. टोमॅटो, चिरून- २ मोठे
  5. आलं-लसूण पेस्ट- १ टेबलस्पून
  6. मालवणी मसाला- ३ ते ४ टीस्पून किंव्हा (२ टीस्पून लाल तिखट + १ टीस्पून गरम मसाला)
  7. हळद- १/२ टीस्पून
  8. हिंग- १/४ टीस्पून
  9. लिंबू रस- १ टेबलस्पून
  10. मीठ- चवीप्रमाणे
  11. तेल- ३ ते ४ टेबलस्पून
  12. साजुक तूप- १ टेबलस्पून
  13. शहाजिरे - १ टीस्पून
  14. तमालपत्र- ३
  15. बाद्यान/चाक्रीफुल- २
  16. मसाला वेलची- २
  17. काळीमिरी- ८
  18. लवंग- ५
  19. दालचिनी- २ इंचाचा तुकडा
  20. नारळाचे दुध- १ कप
  21. गरम पाणी- ३ कप
  22. कोथिंबीर- १/४ कप
  23. तळलेला कांदा-१ कप (ऐच्छिक)

सूचना

  1. कोळंबी सोलून तिचा मधला धागा काढावा. व्यवस्थित धुवून घ्यावी. तिला थोडेसे मीठ, आलं-लसूण पेस्ट, हळद, हिंग, मसाला व लिंबू रस चोळून अर्धा तास मुरत ठेवावी. 
  2. तांदूळ धुवून ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. पाणी काढून निथळत ठेवा. (कोलम तांदूळ भिजत ठेवण्याची गरज नाही.)
  3. पातेल्यात तेल गरम करा. अख्खे/खडे  मसाले फोडणीला घाला. 
  4. त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. कांदा परतुन झाल्यावर त्यात टोमॅटो घालून परता आणि मऊ होईपर्यंत शिजवा. 
  5. मुरत ठेवलेली कोलंबी घालून परता. 
  6. तांदूळ घालून २-३ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाला की गरम पाणी घाला. 
  7. एका उकळी आली की नारळाचे दुध, तूप व गरजेनुसार मीठ घाला. 
  8. हलक्या हाताने ढवळून घट्ट झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवा. भातातले पाणी कमी झाल्यावर मंद आचेवर मुरु द्या.
  9. तळलेला कांदा व कोथिंबीर पेरून गरम गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर