मुख्यपृष्ठ / पाककृती / Keshar Rice With Oranges

6
3
0.0(1)
0

Keshar Rice With Oranges

Feb-15-2018
Neeta Mohite
5 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी बासमती तांदूळ
  2. २०० ग्रॅम साखर
  3. १ मोठे किंवा २ लहान संत्री
  4. ३ मोठे चमचे लोणकढे तूप
  5. ४ दालचिनीचे लहान तुकडे
  6. ४ वेलदोडे
  7. ४ लवंगा
  8. पाव चमचा केशर (दुधात भिजवावे)
  9. १ मोठा चमचा संत्राच्या सालीचा कीस
  10. ८-१० बदाम व काजूचे काप
  11. १०-१२ बेदाणे
  12. खास प्रसंगी चांदीचा वर्ख व चेरीज
  13. ३-४ थेंब ऑरेंज रंग

सूचना

  1. तांदूळ धुवून तासभर बाजूला ठेवावे. ४ कप आधण पाण्यात तांदूळ वैरावे व १२-१३ मिनिटे प्रखर आंचेवर अर्धवट शिजवावे.
  2. चाळणीवर निथळावे व त्यावर थोडे गार पाणी ओतावे. एका ताटात भात पसरून गार करत ठेवावा.
  3. साखरेत एक वाटी पाणी घालून एकतारीपेक्षा जरा कमी असा पाक करावा
  4. एका जाड बुडाच्या पातल्यात तूप तापले की त्यावर लवंगा, दालचिनी व वेलदोडे फोडणीस टाकून त्यावर गार झालेला भात, संत्र्याच्या सालीचा कीस व पाक घालावा.
  5. संत्र्याचा रस काढावा व ताजा रस भातात घालावा. रंगाचे थेंब व काजूबदाम, बेदाणे (निम्मे) घालावे झाकण ठेवावे.
  6. पाच मिनिटांनंतर वाफ आली की पातेल्यासारखी एक तवा ठेवावा. केशर शिंपडावे व मंद आंचेवर भात पुरता शिजवावा.
  7. उरलेले काजू, बेदाणे, वर्ख, चेरीज इत्यादी सजावट करून शोभिवंत भांड्यात भात ठेवावा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-26-2018
BetterButter Editorial   Mar-26-2018

Hi Neeta, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at [email protected] so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर