कोलकाता स्ट्रीट स्टाईल एग रोल | Kolkata Street Style Egg Roll Recipe in Marathi

प्रेषक Moumita Malla  |  28th Feb 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Kolkata Street Style Egg Roll by Moumita Malla at BetterButter
कोलकाता स्ट्रीट स्टाईल एग रोल by Moumita Malla
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3145

0

कोलकाता स्ट्रीट स्टाईल एग रोल recipe

कोलकाता स्ट्रीट स्टाईल एग रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kolkata Street Style Egg Roll Recipe in Marathi )

 • मैदा - 3/4 वाटी
 • अंडी - 2
 • काकडी - अर्धी चिरलेली
 • कांदा - 1 चिरलेला
 • हिरव्या मिरच्या - 2 (चिरलेल्या)
 • टोमॅटो सॉस - 1 मोठा चमचा
 • ग्रीन चिली सॉस - 1 लहान चमचा
 • लिंबाचा रस - 1 लहान चमचा
 • मीठ - स्वादानुसार
 • रिफाईन्ड तेल - 1 मोठा चमचा

कोलकाता स्ट्रीट स्टाईल एग रोल | How to make Kolkata Street Style Egg Roll Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात मैदा आणि किंचित मीठ घेऊन मिसळा. त्यात 1 मोठा चमचा तेल घाला आणि थोडेसे पाणी वापरून मऊ कणिक मळा.
 2. कणिक ओल्या कापडाने झाकून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
 3. आता ते कणिक घ्या आणि 1 मिनिट नीट मिसळा. नंतर त्याचे दोन सारखे भाग करून गोळे करा.
 4. नंतर एक गोळा घ्या आणि त्याला 6 इंच व्यासाइतके लाटून घ्या.
 5. एक वाडग्यात एक अंडे फोडा आणि त्यात मीठ घालून फेटा.
 6. तवा गरम करा आणि त्यावर एक पराठा ठेवा, पराठ्याला चारी बाजूंनी भाजा. त्यानंतर त्यावर थोडे तेल घाला आणि पटकन पलटून दुसऱ्या बाजूने भाजा आणि किंचित तळा.
 7. फेटलेले अंडे त्यावर एक समान पसरवा. अंड्याला 2-3 मिनिटे शिजू द्या. नंतर दुसऱ्या बाजूला पलटून पुन्हा 1-2 मिनिटे शिजवा.
 8. बटर पेपरच्या एका तुकड्यावर एग पराठा ठेवा, यावर चिरलेली काकडी, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो सॉस आणि ग्रीन चिली सॉस पसरवा. लिंबाचा रस आणि मीठ शिंपडा.
 9. नंतर याला बटर पेपरसह रोल करत खालील बाजूस नीट बंद करा आणि वाढा.

My Tip:

कणीक कोरडे आणि खडबडीत होणे टाळण्यासाठी त्याला एका ओल्या कपड्याने झाकून ठेवणे महत्त्वाचे आहे.

Reviews for Kolkata Street Style Egg Roll Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo