अळू वडी | Aluwadi Recipe in Marathi

प्रेषक Mrudula Ghose  |  15th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Aluwadi by Mrudula Ghose at BetterButter
अळू वडीby Mrudula Ghose
 • तयारी साठी वेळ

  40

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

0 votes
अळू वडी recipe

अळू वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aluwadi Recipe in Marathi )

 • ४/५अळू ची पाने
 • १वाटी बेसन
 • २कांदे बारीक चिरून
 • ७/८हिरव्या मिरच्या
 • १०/१२ करी पत्ता
 • मूठभर कोथिंबीर
 • अदरक- लसुण पेस्ट
 • १/४कप चिंचेचा कोळ
 • मिठ, जिर, हिंग

अळू वडी | How to make Aluwadi Recipe in Marathi

 1. बेसनात वरील सर्व साहित्य मिक्स करा व पाण्याने भज्या च्या पिठाप्रमाणे भिजवा.
 2. अळूचे पाने स्वच्छ धुऊन घ्या
 3. आता अळू च्या पानावर हे मिश्रण लावून, त्यावर दुसर पान ठेवून त्या वर पण मिश्रण लावा.
 4. आता हे रोल करून , कुकरमध्ये वाफवून घ्या, १५ मिनिटे.
 5. वाफवून झाल्यावर, त्यांना गार होऊ द्या
 6. गार झाल्यावर त्याचे गोल चकत्या कापून घ्या
 7. हे चकत्या तेलात तळून घ्या
 8. एका कढईत तेल टाकून(२टेबल स्पुन) लांब चिरलेला लसूण, लांब चिरलेला कांदा १,४/५ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, परतून घ्या
 9. त्यात अळू वड्या टाकून थोड्या वेळ वाफ येऊ द्या. व गरम गरम पराठ्या बरोबर वाढा

Reviews for Aluwadi Recipe in Marathi (0)