Photo of Ukdpendi by Geeta Koshti at BetterButter
784
5
0.0(0)
0

ऊकडपेंडी

Feb-15-2018
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऊकडपेंडी कृती बद्दल

जुन्या पद्धतीचा उपमा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १/२ कप रवाळ कणिक
  2. ३ टेस्पून तेल ( लागल्यास आजून घालू शकतो )
  3. १/४ कप कांदा, बारीक चिरून
  4. ४ ते ५ कढीपत्ता पाने फोडणीसाठी
  5. मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/८ टिस्पून हळद,
  6. २ सुक्या लाल मिरच्या - ( हिरवी मिरची टाकली तरी चालेल )
  7. १/२ कप दही, घोटलेले
  8. १/४ कप पाणी
  9. चवीपुरते मिठ , कोथिंबीर

सूचना

  1. कढईत तेल गरम करावे.
  2. कणिक मध्यम आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावी
  3. (साधारण ५ ते ७ मिनीटे). भाजलेली कणिक लहान वाडग्यात काढून ठेवावी.
  4. त्याच कढईत १ टेस्पून तेल घालावे.
  5. मोहोरी, हिंग, हळद, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी
  6. कांदा घालून गुलाबीसर होईस्तोवर परतून घ्यावा
  7. मिठ घालून मिक्स करावे.
  8. भाजलेली कणिक घालून एक-दोन मिनीट मिक्स करावे
  9. दही आणि पाणी मिक्स करावे आणि हे मिश्रण कढईत ओतावे.
  10. पटापट मिक्स करावे. मिश्रणाचा गोळा तयार होईल. एकदम व्यवस्थित मिक्स करावे,
  11. गुठळी होवू देऊ नये. झाकण ठेवून मंद आचेवर काही मिनीटे वाफ काढावी.
  12. कोथिंबीरीने , मिरची सजवून सर्व्ह करावे. ( आवडत असेल त वरतून तेल टाकून पण घेऊ शकतो )

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर